esakal | धुळे ः कोरोना बाधितांची संख्या 27..चिंताजनक स्थिती  ​

बोलून बातमी शोधा

धुळे ः कोरोना बाधितांची संख्या 27..चिंताजनक स्थिती  ​

जिल्हा सर्वोपचार रूग्णालय, पोलिस प्रशासन, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वयातून स्थितीवर नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होते. 

धुळे ः कोरोना बाधितांची संख्या 27..चिंताजनक स्थिती  ​
sakal_logo
By
बी. एम. पाटील

धुळे ः नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आज सापडल्याने धुळे जिल्ह्यातील या आजाराची रूग्णसंख्या 27 झाली आहे. तसेच एका बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने ही संख्या सहावर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. यात धुळे शहरातील सर्वाधिक 19, तर उर्वरित जिल्ह्यातील 7 रूग्णांचा समावेश आहे. नागरिकांना बाहेर फिरू न देणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज जाणकारांकडून व्यक्त होते. 

आर्वजून पहा :  कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून 70 बस रवाना 
 

साक्री शहरात 10 एप्रिलला जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला. त्यानंतर दोन आठवड्यांनी या रूग्णांची मालिका सुरू झाली. ती अद्याप थांबलेली नाही. धुळे शहरात सर्वाधिक 19, तर साक्री शहरात आतापर्यंत चार, शिंदखेडा तालुक्‍यात बाह्मणे, डांगुर्णे मिळून दोन, शिरपूर तालुक्‍यात अमोदे येथील मायलेकी मिळून जिल्ह्यात 27 रूग्ण झाले आहेत. तसेच साक्रीतील दोघांचा, तर धुळे शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या स्थितीत बुधवारी पहाटे साक्रीतील वृध्दाचा, तर मध्यरात्री धुळे शहरातील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच गुरूवारी धुळे शहरातील आझादनगर भागातील 19 वर्षीय तरूणी आणि डांगुर्णे येथे मुंबईहून आलेला 28 वर्षीय तरूण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.  

क्‍लिक कराः मालेगावात बंदोबस्तावरील जळगावचे दोन पोलिस कोव्हिड पॉझेटिव्ह 
 

या पार्श्‍वभूमीवर धुळे शहरात सहा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाले असून तेथे आणि शहरात खबरदारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर टक्के लॉकडाउन जाहीर केले आहे. सद्यस्थितीत 60 टक्‍क्‍याहून अधिक भाग सील झाला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्हा सर्वोपचार रूग्णालय, पोलिस प्रशासन, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वयातून स्थितीवर नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होते. 


जिल्हा रूग्णालयात 74 जणांचे थर्मल स्कॅनिंग झाले. तपासणीनंतर काहींना दाखल करून घेण्यात आले. तेथे एकूण 57 जण दाखल आहेतृ. 29 जणांच्या शरीरातील नमुन्यांची तपासणी करून नमुने घेण्यात आले. आज सकाळी प्राप्त माहितीनुसार 39 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

नक्की वाचा :   मृतदेहांची आबाळ थांबविणार कोण? 
 

आजअखेर 5569 जणांचे थर्मल स्कॅनिंग झाले. 794 जणांची नमुने तपासणी झाली. त्यातील 731 अहवाल निगेटीव्ह, तर 27 अहवाल पॉझिटीव्ह आहेत. अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, सर्वोपचार रूग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी आढावा घेतला.