esakal | देशातील ‘रेड झोन’मध्ये धुळे नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पॉझिटिव्हिटी रेट म्हणजेच शंभर रुग्णांमागे धुळे जिल्ह्यात २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा धागा पकडत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २१) दुपारनंतर झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकारी यादव यांनी जिल्ह्यातील स्थिती घाबरून जाण्यासारखी नाही,

देशातील ‘रेड झोन’मध्ये धुळे नाही 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : कोविडप्रश्‍नी केंद्र आणि राज्य सरकारकडून जाहीर ‘रेड झोन’च्या जिल्हानिहाय क्रमवारीत धुळ्याचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. मात्र, कोविडशी मुकाबला करताना सूचना, नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले. साखरपुडा, विवाह सोहळा, सण-उत्सव, अंत्ययात्रेत नागरिकांनी गर्दी टाळावी, अन्यथा कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे प्रयत्न निष्प्रभ ठरतील, अशी जाणीव माजी मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी करून दिली. 

हेही वाचा - जळगावचा कोरोना विस्फोट पुणे- मुंबई इतका...आजचा आकडा रेकॉर्डब्रेक

१५ दिवसांतील रुग्णसंख्या आणि पाच महिन्यांतील नुमने तपासणी संख्येच्या आधारावर देशात टॉप-टेनमध्ये धुळे, जळगाव, नाशिकचा समावेश दर्शविला जात आहे. यात पॉझिटिव्हिटी रेट म्हणजेच शंभर रुग्णांमागे धुळे जिल्ह्यात २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा धागा पकडत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २१) दुपारनंतर झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकारी यादव यांनी जिल्ह्यातील स्थिती घाबरून जाण्यासारखी नाही, सरकारी यंत्रणा चांगले काम करीत असून, यात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, शारीरिक अंतर पाळणे, सतत हात स्वच्छ धुणे, गरजेवेळीच घराबाहेर पडणे आदी सूचना, नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन केले. 

नक्‍की वाचा - लाडके बाप्पा आणा एक रूपयात...कुठे मिळतेय, काय आहे कारण पहा!


खासदार भामरे, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, सीईओ वान्मती सी., आयुक्त अजीज शेख, हिरे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, आमदार फारूख शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती सुनील बैसाणे, पोलिस अधिकारी, विविध खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २७ टक्के असणे गंभीरच आहे. तो नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न लागतील. जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर पूर्वी १९ टक्के होता. तो सध्या सरासरी १४ ते १५ टक्के आहे. शासनाच्या मानकापेक्षा तो अधिक आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी, पॉझिटिव्हिटी रेषो २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर तो जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट होतो. यात धुळे जिल्ह्याचा समावेश झालेला नाही. त्यामुळे शासनाच्या कोविडप्रश्‍नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी विविध मानकांमध्ये आपल्या जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक आहे. तुलनेत मृत्युदर कमी करण्यात यश येत आहे. 
खासदार भामरे म्हणाले, की कोरोनाची संसर्ग साखळी तोडावी लागेल. त्यासाठी जबाबदारीने वागावे लागेल. 

loading image
go to top