esakal | धुळे महापालिकेकडे मागितले ५० कर्मचारी, पोचले चार
sakal

बोलून बातमी शोधा

dhule hire medical collage

शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य रुग्णांचा हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे ओढा आणि कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रुग्णालयातील खाटाही फुल होत आहेत. रुग्णभार इतर रुग्णालयांकडे वळविण्यासाठी हिरे महाविद्यालय व्यवस्थापनाचा आटापिटा सुरू आहे.

धुळे महापालिकेकडे मागितले ५० कर्मचारी, पोचले चार

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : येथील चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील चतुर्थ व इतर संवर्गातील काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे व्यवस्थापनाने महापालिकेकडे होतकरू ५० कर्मचाऱ्यांची मागणी केली. त्यास प्रतिसाद मिळाला. महापालिकेने प्रथम ३० कर्मचाऱ्यांची नावांसह यादी दिली. मात्र, हिरे महाविद्यालयात शनिवारी (ता. ८) महापालिकेचे केवळ चार कर्मचारी पोचले. इतर कर्मचाऱ्यांची रुग्णालय व्यवस्थापनाला प्रतीक्षा आहे. 

हेपण पहा - बाधितांपैकी ८४ टक्के मृत्यू  ५० पेक्षा जास्त वयोगटांतील 

शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य रुग्णांचा हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे ओढा आणि कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रुग्णालयातील खाटाही फुल होत आहेत. रुग्णभार इतर रुग्णालयांकडे वळविण्यासाठी हिरे महाविद्यालय व्यवस्थापनाचा आटापिटा सुरू आहे. अशात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यासाठी चतुर्थ व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे स्वच्छतेसह विविध प्रश्‍न ऐरणीवर येत आहेत. त्यांचा निपटारा होण्यासाठी हिरे महाविद्यालयाने महापालिकेकडे ५० कर्मचाऱ्यांची मागणी केली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची संमती घेतली. 
महापालिकेने हिरे महाविद्यालयाला प्रथम ३० कर्मचाऱ्यांची नावांसह यादी पाठविली. परंतु चारच कर्मचारी महाविद्यालयात पोचले आहेत. त्यांना विविध कक्षात वॉर्डबॉय स्वरूपाचे काम सोपविले गेले आहे. उर्वरित ४६ कर्मचारी लवकर मिळावे, या प्रतीक्षेत हिरे महाविद्यालय व्यवस्थापन आहे. महाविद्यालयात शनिवारी २७३ पैकी सरासरी पावणेदोनशे रुग्ण उपचार घेत होते. आयसीयूमध्ये सरासरी दहा ते बारा रुग्ण उपचार घेत आहेत. महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोविडचे गंभीर, न्यूमोनियाच्या रुग्णांवर उपचाराचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image