esakal | धुळे "एमआयडीसी'त बेरोजगारांना नोकरीची संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule midc

नोकरी नसल्याने अनेक जण नैराशाशी सामना करीत आहेत. त्यांना धीर, दिलासा द्यावा, त्यांच्या तंत्रकौशल्याचा "एमआयडीसी'तील उद्योगांना लाभ व्हावा, या उद्देशाने संघटना, समितीने समन्वयातून कार्य उभारले आहे. यातील इच्छुकांनी उद्योजक सुभाष कांकरिया ( 98817 86754), भूषण देवळे (97652 29143), वर्धमान सिंघवी (94222 30444) यांच्याशी संपर्क साधावा. 
-सुभाष कांकरिया, जिल्हाध्यक्ष, लघुउद्योग भारती, धुळे  

धुळे "एमआयडीसी'त बेरोजगारांना नोकरीची संधी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : वार्षिक साडेपाच हजार कोटींची उलाढाल असलेल्या येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान शिवारातील "एमआयडीसी' बेरोजगारांच्या मदतीला धावली आहे. कोरोनाच्या संकटकाळात नोकरीप्रश्‍नी हवालदिल असलेल्या तरुणांसाठी लघुउद्योग भारती संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती "दुवा' ठरली आहे. यात तीन तरुणांना "एमआयडीसी'तील औद्योगिक प्रकल्पांनी "कॉल' दिला आहे. 
"कोरोना'मुळे शहरासह जिल्ह्यात 25 मार्चपासून लॉकडाउन झाले. त्यात "एमआयडीसी'मधील केवळ कृषिपूरक उद्योग, ऑइल मिल सुरू होत्या. परप्रांतीय, प्रतिबंधित (कंटेन्मेंट) क्षेत्रात कामगार वर्ग अडकल्याने अनेक औद्योगिक प्रकल्पातील उत्पादनांवर परिणाम झाला. सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने 17 मेपासून येथील "एमआयडीसी'त काही प्रमाणात औद्योगिक प्रकल्प सुरू झाले. मात्र, त्यांना कामगार कमतरतेचा प्रश्‍न भेडसावू लागला. 5 जूननंतर अटी-शर्तींवर औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यास मुभा मिळाल्याने अर्थकारणाला काहीअंशी गती मिळाली. 

"कोरोना'मुळे संकटकाळ 
कोरोनाच्या संकटकाळात सर्व स्तरांवर उलाढाल ठप्प झाल्याने खासगी क्षेत्रातील अनेक तरुण, प्रौढांच्या रोजगारावर गदा आली आणि ते बेरोजगार झाले. त्यांच्यापुढे चार महिने चरितार्थाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. अशात हॉटेलमधील वेटर तरुणाने नैराशातून आत्महत्या केल्याची क्‍लेशकारक घटनाही शहरात घडली. ही गंभीर स्थिती लक्षात घेत लघुउद्योग भारती ही औद्योगिक संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती बेरोजगारांच्या मदतीसाठी सरसावली. यात समन्वयातून त्यांनी "एमआयडीसी'त बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे आणि औद्योगिक प्रकल्पांना कामगार वर्गाबाबत भेडसावणारी समस्याही सुटावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

बेरोजगारांचा प्रतिसाद 
लघुउद्योग भारतीसह जनकल्याण समितीने विविध पातळीवरून बेरोजगारांची माहिती संकलित करण्यास सुरवात केली आहे. त्यास काही तरुण बेरोजगारांनी प्रतिसाद दिला. फिटर, वेल्डर, व्यवस्थापनासह विविध तंत्रकौशल्यातील पदांसाठी आयटीआय, बी. फार्मसी, व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातील तरुणांनी परिचयपत्र दिले आहेत. पैकी तीन जणांना "कॉल' दिला गेला आहे. "एमआयडीसी'तील निरनिराळ्या औद्योगिक प्रकल्पांना अपेक्षित तंत्रकौशल्य अवगत असलेल्या तरुणांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. लघुउद्योग भारतीच्या पदाधिकाऱ्यांसह जनकल्याण समितीचे भूषण देवळे, हेमंत कापडी, महेंद्र विसपुते आदी समन्वयातून बेरोजगारांच्या मदतीला धावले आहेत.