esakal | धुळ्यात मनसेतर्फे चीनच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule mns

कोरोनाच्या महामारीत एकीकडे सारे जग झुंजत असताना चीनने आपले विस्तारवादी धोरण अवलंबिले आहे. या अनुषंगाने भारत- चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमावादाचा मुद्दा काढून भारतीय लष्कराला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे.

धुळ्यात मनसेतर्फे चीनच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : सीमावादाच्या मुद्यावरून भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हिंसक कृत्यातून भारतीय लष्कराचे 20 जवान धारातीर्थी पडले. चीनच्या या आगळिकीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील आग्रा रोडवर चीनच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन धुळेकरांना केले. 

आवर्जून वाचा - बापरे...जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचाही "2020' 


कोरोनाच्या महामारीत एकीकडे सारे जग झुंजत असताना चीनने आपले विस्तारवादी धोरण अवलंबिले आहे. या अनुषंगाने भारत- चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमावादाचा मुद्दा काढून भारतीय लष्कराला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच चिनी सैनिकांनी केलेल्या हिंसक कृत्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चिनी मालावर बहिष्कार टाकून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

क्‍लिक करा - तळोदा तालुक्यात ७१ लाखाचे नुकसान 

नागरिकांनी चिनी माल खरेदी करू नये असे आवाहनही केले. आंदोलनात मनसेचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी रावसाहेब कदम, जिल्हाध्यक्ष ऍड. दुष्यंत देशमुख, अजितसिंह राजपूत, संदीप जडे, महानगराध्यक्ष संजय सोनवणे, संतोष मिस्त्री, मगन पाटील, राजेश दुसाने, तुषार चौधरी, अनिल खेमनार, साहिल खान, जगदीश गवळी, अविनाश देवरे, बापू ठाकूर आदी सहभागी झाले होते.

loading image