esakal | प्रथम तरतूद; नंतर अंदाजपत्रकातून गायब ! आणि सदस्यांचा संताप

बोलून बातमी शोधा

dhue municipal corporation
प्रथम तरतूद; नंतर अंदाजपत्रकातून गायब ! आणि सदस्यांचा संताप
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : महापालिकेचे (dhue municipal corporation) अंदाजपत्रक (Budget) तयार होताना चितोड रोड परिसरातील अमरधामसाठी ९६ लाखांच्या निधीची तरतूद दिसली. यासंदर्भात महापौरांच्या (mayor) निर्णयाचे स्वागत झाले. मात्र, नंतर अंदाजपत्रकातून हा निधी गायब झाला. यामागचे कारण काय, असा संतप्त सवाल उपस्थित करत याबाबत उकल होईपर्यंत स्थायी समितीची सभा महासभेपर्यंत तहकूब ठेवावी, अशी मागणी नगरसेवक शीतल नवले यांच्यासह अन्य सदस्यांनी केली.
(dhule municipal corporation budget meeting standing committee members angry)

हेही वाचा: धुळ्यात गर्दीचा महापूर; मनपा प्रशासन, पोलिसांनी हात टेकले


महापालिकेच्या स्थायी समितीची (standing committee) विशेष अंदाजपत्रकीय सभा सभापती संजय जाधव (standing committee speaker sanjay jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक सुनील बैसाणे, नागसेन बोरसे, नवले, अमोल मासुळे, अमिन पटेल, नगरसेविका भारती माळी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

दिशाभूल करणारे अंदाजपत्रक : बैसाणे
श्री. बैसाणे यांनी लेखाधिकारी सभेत का हजर राहात नाही, याचा जाब विचारला. हा धागा पकडत चार कोटी रुपयांची बिले अदा करण्यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मनपा हद्दवाढीतील अंशतः नगावसह अकरा गावांचा भांडवली खर्च दीडशे कोटींचा दर्शविला आहे. हद्दवाढीतील नागरिक सुविधांअभावी त्रस्त आहेत. त्यामुळे हद्दवाढीत कुठली कामे सुचविली आहेत, याचा उल्लेख नाही. तसेच शहरातील पाणीप्रश्नी पाच कोटींच्या निधीची तरतूद व्हावी. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी अनधिकृत मोबाईल टॉवरवर दंडात्मक कारवाई व्हावी. स्व-जागांचेही मूल्यांकन करावे, असे सांगत अंदाजपत्रक दिशाभूल करणारा असल्याचे श्री. बैसाणे म्हणाले. श्री. पटेल यांनी पाणीप्रश्नी दहा कोटींच्या तरतुदीची मागणी केली.

हेही वाचा: बापरे..आठवड्यात १३८ मृतांवर अंत्यसंस्कार; दोन शिफ्टमध्ये कर्मचारी

भाजपला घरचा आहेर
श्री. बोरसे यांनीही अंदाजपत्रकात त्रुटी असल्याचे स्पष्ट केले. गेल्यावेळी महापौरांनी उत्पन्नाबाबत सुचविलेल्या स्त्रोतातून कुठलाही लाभ साध्य झाला नाही. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अंदाजपत्रकात ४० ते ४५ कोटींची तूट दिसून येते. महापौरांनी सुचविलेल्या काही तरतुदींपैकी किती कार्यादेश निघाले? यात उत्पन्नाची बाजू दर्शविण्यावर चर्चा होते. असे सुरू राहिल्यास आगामी तीन वर्षांत महापालिकेवर दीडशे कोटींचा बोजा शक्य असेल. त्यामुळे लेखाधिकारी पदासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्यावर लिपिकाची नियुक्ती करणे चुकीचे आहे, असे श्री. बोरसे म्हणाले. महापालिकेत भाजपची सत्ता असून या पक्षाच्या सदस्यांनीच अंदाजपत्रकाची चिरफाड, टीकाटिप्पणी करत घरचा आहेर दिल्याची प्रतिक्रिया सभेनंतर उमटली.

हेही वाचा: मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

सुरत मनपाप्रमाणे कार्यवाही व्हावी...
श्री. नवले यांनी अंदाजपत्रकावर टीका केली. त्यात फुगीर आकडे दाखविण्यात येऊ नये. महापालिकेवर ७० ते ७५ कोटी रुपयांचे दायित्व आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तालयाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. तरीही देयके काढली जात नाहीत. ही आदेशाची पायमल्ली आहे. मोबाईल टॉवर प्रकरणी सुरत महापालिकेप्रमाणे येथे कार्यवाही व्हावी, अशी सूचना श्री. नवले यांनी केली.

(dhule municipal corporation budget meeting standing committee members angry)