esakal | डेंगीचे डास आढळले, तर गुन्हा दाखल करू-मनपा आयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगीचे डास आढळले, तर गुन्हा दाखल करू-मनपा आयुक्त

डेंगीचे डास आढळले, तर गुन्हा दाखल करू-मनपा आयुक्त

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : शहरात डेंगीने मोठी समस्या निर्माण केली असून, ज्यांच्याकडे डेंगीचे रुग्ण (Dengue patients) आढळले, त्यांच्याकडे पुन्हा डेंगी डास आढळले, तर प्रथम नोटीस व नंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा (Dhule Municipal Corporation) महापालिका आयुक्त अजीज शेख (Commissioner Aziz Sheikh)यांनी दिला.

हेही वाचा: प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा


महापालिकेच्या या जावईशोधाबाबत आश्‍चर्य व्यक्त होते. डेंगी साथीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी आयुक्त शेख यांनी महापालिकेत बैठक बोलविली होती. आयुक्त शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, हिवताप अधिकारी डॉ. पाटील, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, फवारणीचा ठेका दिलेल्या दिग्विजय इंटरप्रायजेसचा प्रतिनिधी गायकवाड आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: पीक विमाची भरपाई न देणाऱ्या पाच बँकांवर गुन्हा दाखल


आयुक्त म्हणाले, की डेंगी डोके वर काढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मनपा यंत्रणा जनजागरणात काहीशी सुस्तावलेली दिसत आहे. त्यामुळे जनतेत जागृती करा, ज्या ठिकाणी डेंगीचा रुग्ण आढळला असेल, तेथे तत्काळ फवारणीसह इतर उपाययोजना करा. त्यानंतरही डेंगीचे डास आढळले, तर संबंधिताना नोटिसा बजवा, दंड आकारा आणि शेवटी गुन्हा दाखल करा, असा अजब आदेश आयुक्तांनी यंत्रणेला दिला. डेंगीबरोबर झिका व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डास निर्मूलनावर भर देण्याची गरज आहे. दिग्विजयचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबाबत आयुक्तांनी संबंधित प्रतिनिधीला धारेवर धरले.

हेही वाचा: नाही भाव अंगी भूषण मिरवीतो जगी !


बैठकीत सार्वजनिक स्वच्छता व मलेरिया, डेंगी या साथीच्या आजारावरील उपाययोजनांबाबत चर्चेनंतर सर्व स्वच्छता निरीक्षक, मलेरिया फिल्ड वर्कर, वॉटर ग्रेस कंपनीचे प्रतिनिधी, दिग्विजय कंपनीचे प्रतिनिधी यांना प्रभावी कामगिरीची सूचना आयुक्तांनी दिली. तसेच घंटागाडीचे योग्य व सूक्ष्म नियोजन करावे. ठेकेदाराने नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्त करून घ्याव्यात. स्वच्छता निरीक्षकांनी आपापल्या भागात सर्व ठिकाणी घंटागाडी फिरतील याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात. डेंगी, चिकूनगुनिया संदर्भात शहरातील सर्व दवाखान्यांना पत्र देऊन त्यांचा दैनंदिन अहवाल मनपाला कळविण्याबाबत आदेश द्यावा. दिग्विजय कंपनीने शहरात जनजागृती करावी. तसेच नागरिकांना टोल फ्री क्रमांक द्यावा. मलेरिया फिल्ड वर्कर्सने सर्व्हेतून अबेटिंग करावे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात डेंगीच्या अळ्या सापडतील त्यांना समज द्यावी. पुन्हा अळ्या आढळल्यास त्यांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली.

loading image
go to top