अबब.. थुंकणाऱ्यांना 11 हजार; मास्क नसलेल्यांना 22 हजार दंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

महापालिकेच्या विविध भागांतील पथकांनी केवळ सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 110 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे 11 हजार रुपये दंड वसूल केला.

धुळे ः "कोरोना' विषाणूंचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई केली असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यात आतापर्यंत केवळ रस्त्यावर थुंकणाऱ्या 110, मास्क न लावणाऱ्या शंभरावर नागरिकांकडून तब्बल 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

आर्वजून पहा :  कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून 70 बस रवाना 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क अथवा तोंडाला रुमाल न बांधणाऱ्यांना 200 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना प्रत्येकी शंभर रुपये दंड करण्यात येत आहे. या कारवाईत आतापर्यंत महापालिकेच्या विविध भागांतील पथकांनी केवळ सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 110 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे 11 हजार रुपये दंड वसूल केला. तोंडाला मास्क अथवा रुमाल न लावणाऱ्या 113 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 22 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

क्‍लिक कराः मालेगावात बंदोबस्तावरील जळगावचे दोन पोलिस कोव्हिड पॉझेटिव्ह 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Municipal Corporation Spit and without masks Action