esakal | मूठभर लोकांनी नोकरभरती बंद पाडली; ओबीसी आरक्षण बचावचे आंदोलन !
sakal

बोलून बातमी शोधा

मूठभर लोकांनी नोकरभरती बंद पाडली; ओबीसी आरक्षण बचावचे आंदोलन !

लाखोंच्या संख्येने बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना मूठभर लोकांची झुंडशाही सरकार का सहन करून घेत आहे.

मूठभर लोकांनी नोकरभरती बंद पाडली; ओबीसी आरक्षण बचावचे आंदोलन !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला फक्त स्थगिती दिली आहे. नोकरभरती अथवा एमपीएससी परीक्षेला स्थगिती दिलेली नाही. पण, काही मूठभर लोकांनी शासनाला वेठीस धरून नोकरभरती बंद पाडली, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, राज्याचा कारभार ठप्प केला आहे, असा आरोप करत शासनाने नोकरभरती सुरू करावी, एमपीएससी परीक्षा घ्यावी अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाने  केली. मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. 

आवर्जून वाचा- अनेक प्रश्‍न अनुत्तरित, पोलिसांचा कंबर कसून तपास तरी निष्पाप प्राचीच्या हत्येचे गूढ कायम ! 
 

लाखोंच्या संख्येने बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना मूठभर लोकांची झुंडशाही सरकार का सहन करून घेत आहे असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक लाखांची नुकसानभरपाई ताबडतोब द्यावी, गायकवाड आयोगाचा अहवाल जनतेसमोर उघड करावा, राज्य मागास आयोग नेमावा, खोटे कुणबी सर्टीफिकेट घेऊन ओबीसी आरक्षणाचा फायदा लाटणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, कुणबी सर्टीफिकेट असलेल्या महिलेने मराठा व्यक्तीशी विवाह केल्यानंतर ती मराठा कुटुंबाची सदस्य म्हणून तिचे कुणबी सर्टीफिकेट रद्द करावे, मराठा समाजाला ईडब्ल्यूएस संवर्गात समाविष्ट करून त्यांच्यासाठी वेगळे १५ टक्के आरक्षण द्यावे, त्यासाठी विधानसभेत विधेयक मांडून तसा कायदा करावा, महाज्योती संस्थेला ५०० कोटी आणि ओबीसी वित्त महामंडळाला हजार कोटी रुपयांचा निधी देऊन बेरोजगार ओबीसी विद्यार्थ्यांना त्वरित वाटप करावा, ओबीसी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती त्वरित अदा करावी आदी मागण्या संघटनेने केल्या.

वाचा- अरेच्चा : गावराण अंडीसाठी करावे लागते अ‍ॅडव्हान्स बुकींग; दोन आठवड्यांची वेटींग ! 
 

आंदोलनाचे अध्यक्ष दिलीप देवरे, बी. एन. बिरारी, ज्ञानेश्‍वर माळी, संजय वाल्हे, एस. टी. चौधरी, शैलेश पवार, नरेंद्र हिरे, दीपक खैरनार, राजेश दुसाने, अश्पाक शेख, पंडित जगदाळे, योगेश खैरनार, संतोष मिस्तरी, कृष्णा शिंदे, पारस देवपुरकर, एकनाथ अडावदकर, बी. एस. जाधव, प्रकाश महाले, सुनील सपकाळ, राजकिशोर तायडे, श्रीकांत बनछोड, सुनील सोनार, प्रा. अण्णा माळी, संजय माळी, भानुदास लोहार, रुपेश सपकाळ, धनराज भामरे, राकेश गाळणकर आदींचा या आंदोलनात सहभाग होता.  

संपादन- भूषण श्रीखंडे