esakal | धुळे एसआरपी बाराशे जवानांनी दिला दोन लाख 98 हजारांचा निधी; औषधांचेही केले वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule

एसआरपीचे बाराशे जवान मदतीसाठी सरसावले. त्यातून ही मदत उभी राहिली. निधी व पावणेदोन लाख किंमतीचे धान्य जमा करून नागरिकांना वाटप करणे सुरू आहे.

धुळे एसआरपी बाराशे जवानांनी दिला दोन लाख 98 हजारांचा निधी; औषधांचेही केले वाटप 

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर समाजाप्रती संवेदनशीलता जोपासत धुळे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाचे अधिकारी व जवानांनी एकत्र येत दोन लाख 98 हजारांचे आर्थिक योगदान दिले. यात धुळे एसआरपीचे बाराशे जवान मदतीसाठी सरसावले. त्यातून ही मदत उभी राहिली. निधी व पावणेदोन लाख किंमतीचे धान्य जमा करून नागरिकांना वाटप करणे सुरू आहे. दररोज होमिओपॅथी औषधे वाटप केले जात आहे. 

नक्‍की पहा - लॉकडाऊन वाढवतोय डोळ्यांचा त्रास...मुलांमध्ये अधिक दुष्परिणाम 


राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई, गोरेगांव, मालेगाव, धुळे शहर, ग्रामीण भागात मोराणे प्र.ल, कुसुंबा, पोलिस अधीक्षक कार्यालय, पोस्ट कार्यालय, एसटी महामंडळ, राज्यातील सोळा राज्य राखीव पोलीस बल गटांचे कुटुंब आदी आवश्‍यक ठिकाणी मागणीनुसार दीड लाखांवर होमिओपॅथी औषधे वाटप करण्यात आल्याची माहिती एसआरपीचे जिल्हा समादेशक संजय पाटील यांनी "सकाळ'शी बोलतांना दिली. 

जेवणाचे पाकिटांचेही वाटप 
आतापर्यंत साडेसात हजार नागरिकांची एकवेळ जेवणाची सोय एसआरपीने केली आहे. दहा हजार कुटुंबांना आठवडाभराचा शिधा पॅकेट व सुरतकडून येणारे ऊसतोड मजूरांना जेवण देण्यात आले. जिल्ह्यात गावागावात एसआरपी व्हॅनद्वारे कोरोनावर प्रबोधन केले जात आहे. पल्समीटर व थर्मामीटर सहाय्याने तपासणी, शासकीय वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करीत आहे. पुणे येथे उपमहापौर आबा बागुल यांच्या माध्यमातून वीस हजार औषध पॅकेट, मालेगाव येथे दहा हजार पॅकेट, धुळे शहर महाले प्रतिष्ठान सात हजार, उपमहापौर श्रीमती अंपळकर यांच्या माध्यमातून पाच हजार, मोराणे प्र. ल. पाच हजार, कुसुंबा सात हजार औषध पॅकेटांचा समावेश आहे. कुसुंबा (ता धुळे) येथे एसआरपीचे जिल्हा समादेशक संजय पाटील, सहाय्यक समादेशक सदाशिव पाटील, पोलिस निरीक्षक नामदेव पवार, किशोर सोनवणे, पी.जी.तायडे, कर्मचारी, उपसरपंच स्वाती जाधव, पोलिस पाटील आकाश भदाणे, ग्रामसेवक बी.एल.पाटील, तलाठी एस.जी.सूर्यवंशी, पोलिस हवालदार रोहिदास सांळुखे उपस्थित होते. 

"सामाजिक बांधिलकी च्या पार्श्वभूमीवर नामवंत होमिओपॅथी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मालेगाव येथील अनुभव लक्षात घेता नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी. यासाठी औषधे देत आहोत. राज्यभरात शक्‍य ती मदत करीत आहोत." 
संजय पाटील, जिल्हा समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा. 

loading image