esakal | चीनच्या सीमेवर तैनात जवान देत आहेत ऑनलाईन परीक्षा!
sakal

बोलून बातमी शोधा

online exam

लेह- लद्दाखसोबतच हरियाणाच्या कर्नाल याठिकाणी भारत व चीन सीमेवर तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशाच्या सीमेचे डोळ्यात तेल घालून रक्षण करित आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे; यासाठी त्यांनी कसून अभ्यासही केला आहे.

चीनच्या सीमेवर तैनात जवान देत आहेत ऑनलाईन परीक्षा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कासारे (धुळे) : देशाच्या सीमेवर रक्षणाची जबाबदारी अहोरात्र पार पाडणारे सैनिक मालपूर येथील कमलेश भामरे व छडवेल (कोर्डे) येथील किशोर साळुंके हे दोघे जवान आपली शैक्षणिक पात्रता उंचावण्यासाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाइन देत आहेत. 
साक्रीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे. त्यात
लेह- लद्दाखसोबतच हरियाणाच्या कर्नाल याठिकाणी भारत व चीन सीमेवर तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशाच्या सीमेचे डोळ्यात तेल घालून रक्षण करित आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे; यासाठी त्यांनी कसून अभ्यासही केला आहे. तालुक्यातील मालपुर येथील कमलेश भामरे व छडवेल (कोर्डे) येथील किशोर साळुंके हे दोघे जवान यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा देत आहेत.

म्‍हणून झाले शक्‍य
पदवी परीक्षेची अंतिम वर्षांची परीक्षा सीमेवर कार्यरत असलेले जवान किशोर साळुंखे व कमलेश भामरे हे लेह-लद्दाख आणि कर्नाल या आपापल्या सीमेवरील तैनातीच्या ठिकाणाहून ऑनलाईन परीक्षा देत आहेत. अशी माहिती साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे, सचिव अॅड. गजेंद्र भोसले व प्राचार्य एम. एम. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र अग्रवाल यांनी दिली. 

८० टक्‍के विद्यार्थी देताहेत परीक्षा
कोरोना महामारीमुळे सर्वच शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ बंद असल्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. राष्ट्राच्या सीमेचे रक्षण करतानाच ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या भामरे व साळुंखे या जवानांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान केंद्राचे समन्वयक प्रा. दीपक काकड यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी या केंद्रातून 260 विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत आहेत. ऑनलाइन परीक्षा सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. मात्र तरीही 80 टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली आहे. नाशिक विभाग व नगर जिल्हा मिळून पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे