व्हॉटस्‌ऍपच्या फोटोतल्या तिच्यासाठी त्याने दिले साडेचार लाख

Obscene photo
Obscene photo

धुळे : शहरातील जयशंकर कॉलनीमधील एका युवकाला मोबाईलवर युवतीचे अश्‍लिल फोटो पाठवून, त्याच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. याकरीता त्याच्याकडून वेळोवेळी एका महिन्यात तब्बल 4 लाख 59 हजार रूपये ठगसेनांनी गंडविले. संबंधीत युवकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस ठाणे गाठून फसवणूक करणाऱ्या उत्तरप्रदेशमधील दोघांविरोधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

 
जयशंकर कॉलनीतील उमेर (नाव बदलेले) अकरावीत असलेला 17 वर्षीय अल्पवयीन युवक. या युवकाला 5 ऑक्‍टोंबर 2019 रोजी मोबाईलवर कृष्णा भगवती चौबे (वय26, रा.आझमगड, उत्तरप्रदेश) आणि शिवसेवक रामसेवक (रा.चित्राखोर, उत्तरप्रदेश) नावाच्या व्यक्‍तींचा कॉल आला. त्यांनी उमेर याच्याशी व्हॅटसअपवरून चॅटींग करण्यास सुरवात केली. 

मग केली पैशांची मागणी 
व्हॉटस्‌ऍपवर उमेर यास महिलांचे अश्‍लिल फोटो पोस्ट केले. त्यानंतर त्याला ज्या महिलांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोमधील महिला हव्या असलेल्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे आमिष दोघांनी उमरला दाखविले. यानंतर त्यांनी उमरकडे पैशांची मागणी केली. त्यांच्या आमीषाला बळी पडून उमरने जानेवारीपर्यंत दोन वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये 4 लाख 59 हजार रूपये टाकले. मात्र तीन महिने उलटूनही सांगितल्याप्रमाणे महिला मिळाल्या नाही. त्यामुळे दोघे भामट्यांनी आपली इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दोघे भामट्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com