esakal | महिलांनी सुरू केली कंपनी; इतर विक्रेत्‍यांपेक्षा कमी दरात माल
sakal

बोलून बातमी शोधा

women company

महारष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित (एमसीडीसी) पुणेचे विभागीय व्यवस्थापक मुरलीधर पाटील यांनी महिला खानदेशी शेतकरी उत्पादक कंपनीला शेतकऱ्यांसाठी कमी दरात खत उपलब्ध करून देत आहेत.

महिलांनी सुरू केली कंपनी; इतर विक्रेत्‍यांपेक्षा कमी दरात माल

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : प्रत्येक क्षेत्रात व्यावसायिकरण झाले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. पण शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठीचे सर्वच रासायनिक घटक अव्वाच्या सव्वा भावात मिळतात. अशा स्थितीत रतनपूरा (ता.धुळे) परीसरातील महिला पुढे सरसावल्यात. महिला खानदेशी प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. अन्‌ पाहता पाहता शेतकऱ्यांना माफक किंमतीत बियाणे, खते आणि फवारणी नाशक औषधी पुरविण्यासाठी परवाना मिळवित प्रशस्त दुकानही सुरु केले आहे. खानदेशातील या आत्मनिर्भर महिलांची दमदार वाटचाल सुरु झाली आहे.

महारष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित (एमसीडीसी) पुणेचे विभागीय व्यवस्थापक मुरलीधर पाटील यांनी महिला खानदेशी शेतकरी उत्पादक कंपनीला शेतकऱ्यांसाठी कमी दरात खत उपलब्ध करून देत आहेत. यामुळे कृषी निविष्ठा पुरवठा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व नाबार्डचे अधिकारी विवेक पाटील, लुपिन संस्थेचे प्रकल्प समन्वयक योगेश राऊत, श्री.चंदन, विजय पाटील उपस्थित होते.

लुपिन फाऊंडेशन व नाबार्डचे सहकार्य
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्यासाठी लुपिन फाऊंडेशन व नाबार्डचे मोठे सहकार्य मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ होत आहे. शेतकरी कंपनी स्थापन करण्यासाठी स्वतःहून पुढे येवू लागले आहेत. महिला कंपनीने स्वतःचे दुकान सुरु करुन खानदेशारत आघाडी घेतली आहे.

कंपनीच्या कारभारीणी तथा पदाधिकारी
महिला कंपनीचे अध्यक्ष निर्मला सोनवणे (हेंद्रुण), उपाध्यक्ष भारती पाटील (रतनपूरा), सचिव कल्पना पाटील (नंदाळे), मुख्य कार्यकारी अधिकारी मिराबाई पाटील (तरवाडे), रेखा माळी, सुनीता माळी, सरला माळी (सर्व रतनपूरा), भावना माळी (नंदाळे), रेखा पाटील (नंदाळे),सीमा महाजन (तरवाडे), योजना देसले (विंचूर), आशा शेवरे (नंदाळे) व शोभाबाई भदाणे (रतनपूरा). 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image