भाजपनेच रंधेंना न्याय दिला; कारभाराचे "मॉनिटरिंग' करू 

dhule zp
dhule zp

धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे, तर उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांची आज निवड झाली. त्याचे स्वागत करत रंधे यांना भाजपनेच न्याय दिल्याची प्रतिक्रिया नेते अमरिशभाई पटेल यांनी दिली, तर कारभाराचे नियमित बैठकीतून "मॉनिटरिंग' करू, ग्रामीण विकासाला बळ देऊ, अशी प्रतिक्रिया नेते जयकुमार रावल यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 


माजी शिक्षणमंत्री पटेल म्हणाले, की शिरपूर तालुक्‍यातील चांगल्या कार्यकर्त्याला मदत मिळाली. तालुक्‍याचा लौकिक वाढविणाऱ्या रंधे परिवारातून म्हणजेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव रणधीर यांचे नातू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्याचा आनंद आहे. त्यांना योग्यच न्याय मिळाला आहे. त्यांना भाजपनेच खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. त्यामुळे मी पक्षाचा आभारी आहे. 
माजी मंत्री व आमदार रावल म्हणाले, की आमदार, खासदार, महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या अधिकतर भाजपच्या ताब्यात असल्याने जिल्ह्यात एक चांगला योग आला आहे. तो म्हणजे ग्रामीण विकासाला चालना, ताकद, बळ देताना नेतृत्वाचा एकच आवाज असणार आहे. तीन माजी मंत्री, अनुभवी पदाधिकारी, सदस्यांमुळे चांगली "टीम' झाली असून त्याच्या अनुभवाचा लाभ ग्रामीण व जिल्हा विकासासाठी होणार आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत रुजवून सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू. 
 
विकासाचा अनुशेष भरू ः रंधे 
जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार रंधे म्हणाले, की शिरपूर तालुक्‍यातील जनतेने रंधे परिवारावर भरभरून प्रेम केले. नेते अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशिराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील राहील. मला प्रचंड मताधिक्‍याने विजयी करणाऱ्या विखरण गटातील मतदारांचे आभार मानतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com