दुसाणे गावच्या "लेकी'ची "हॉटस्पॉट' मालेगावला रुग्णसेवा 

सुकलाल सूर्यवंशी
Wednesday, 13 May 2020

आत्तापर्यंत साधारण 250 कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केला आहे. यातील बरेच रुग्ण चांगले होऊन घरीदेखील परतले आहेत.

दुसाणेः मालेगावमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे येथे सेवा देण्यासाठी अधिकारी-कर्मचारीदेखील घाबरत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले. मात्र, अनेक अधिकारी-कर्मचारी मोठ्या हिंमतीने आपली सेवा बजावत असल्याचेही पाहायला मिळते. अशाच हिंमतीने नाशिक सिव्हील हॉस्पीटलमधील डॉक्‍टरांचे पथक मालेगावला सेवा बजावत आहे. यातील एका पथकात दुसाणे (ता. साक्री) च्या डॉक्‍टर लेकीचाही समावेश आहे. या डॉक्‍टर लेकीचे सर्वत्र कौतुक होत असल्याने दुसाणे गावाचीही शान वाढली आहे. 

आर्वजून पहा : तापीचा किनाऱ्यावर झाला अनोखा विवाह...गावभर चर्चा मात्र नवरदेव, नवरीच्या उंचीची ! 

कोविड-19 अर्थात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नाशिक सिव्हील हॉस्पीटलची पथकेही सेवा बजावत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश्‍वरी किशोर महाले (मराठे) यांच्या पथकाचाही यात समावेश आहे. डॉ. श्रीमती महाले या दुसाणे (ता. साक्री) च्या आहेत. त्यांच्या पथकाने आत्तापर्यंत साधारण 250 कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केला आहे. यातील बरेच रुग्ण चांगले होऊन घरीदेखील परतले आहेत, त्यामुळे उपचार करणारे हे डॉक्‍टर म्हणजे आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आल्याची भावना हे रुग्ण व्यक्त करतात. 

क्‍लिक कराः आगामी काळात स्वयंशिस्त पालनच "कोरोना'पासून वाचविणार :जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 
 

पथकाचे जोरदार स्वागत 
डॉ. श्रीमती महाले यांच्या पथकाने कोरोनाचे हॉटस्पॉट मालेगावला जाऊन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या पथकाचे टाळ्या वाजुन जोरदार स्वागत केले. 

दुसाणे गावाचीही शान वाढली 
डॉ. श्रीमती महाले या दुसाणे गावच्या लेक व सूनदेखील आहेत. नोकरी निमित्त नाशिक येथे स्थायिक आहेत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. या दोन्ही मुलांना त्यांनी दुसाणे येथे आजोबांकडे सोडले असुन वैद्यकीय सेवेचे कर्तव्य बजावण्यासाठी गेल्या 15-20 दिवसापासून त्या मालेगावला आहेत. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. श्रीमती महाले या दुसाणे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ हरिभाऊ भदाणे यांच्या जेष्ठ कन्या तर (कै) मुरलीधर भिलाजी महाले यांच्या सुन आहेत. त्यांच्या कार्याचे गावात कौतुक होत आहे.

नक्की वाचा : ज्वारी, मका खरेदीसाठी जिल्ह्यात 15 केंद्र- मंजुरीसाठी प्रस्ताव सादर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dusane girl hotspot Malegaon helth service