Video विदेशी पाहुण्यांचा कृष्णभक्तीचा जागर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

गणेश कॉलनी, कोर्ट चौक, टॉवर चौक, गोलाणी मार्केट परिसर अशा विविध भागांत भजन, कीर्तनाद्वारे कृष्णभक्तीचा जागर केला. तर शिवाजी पुतळ्याजवळ या प्रचाराची सांगता केली. 

जळगाव : "इस्कॉन'तर्फे कृष्णभक्तीचा जगभरात प्रचार केला जातो. प्रचारासाठी विदेशातून सहा महिने विदेशी भक्त भारतात येतात. शहरात आज गणेश कॉलनीच्या रस्त्यावर विदेशी पाहुणे "हरे रामा हरे कृष्णा' 
नामाचे भजन, कीर्तन तसेच नृत्य करून कृष्णभक्तीचा प्रचार करणाऱ्या या विदेशी पाहुण्यांनी येणाऱ्या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधले. अनेकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ देखील काढले. 

क्‍लिक करा > मळ्यात गेलेले आजोबा- नातू परतेच नाही... 

इस्कॉनच्या शाखेतर्फे शहरात गेल्या दोन दिवसांपासून विदेशी पाहुणे कृष्णभक्तीचा प्रचार करीत आहेत. यात जयगोपाल दास (रशिया), जॉन हरिदास (गैनीताल), कन्हय्या दास (अमेरिका), चैतन्य दास (अमेरिका) यांचा समावेश आहे. त्यांनी आज गणेश कॉलनी, कोर्ट चौक, टॉवर चौक, गोलाणी मार्केट परिसर अशा विविध भागांत भजन, कीर्तनाद्वारे कृष्णभक्तीचा जागर केला. तर शिवाजी पुतळ्याजवळ या प्रचाराची सांगता केली. 

अवश्‍य वाचा > अबब...शेतकऱ्यांकडे कितीही थकबाकी 
जिल्हाभरात प्रचार 
"इस्कॉन'तर्फे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचार केला जातो. त्यानुसार पुढील तीन दिवस हे विदेशी पाहुणे संपूर्ण जिल्ह्यात कृष्णभक्तीचा जागर करणार आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्ली, भोपाळ, नागपूर, अमरावती येथे प्रचार केला आहे. त्यानंतर धुळे, शिरपूर, पंढरपूर असा प्रवास करून ते आपापल्या देशात परत जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news iscon hare krushna jagar city