अमळनेर ठरतेय 'कोरोना हॉटस्पॉट'...संचारबंदीच्या कठोर अमलबाजवणी 

योगेश महाजन
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेने शहरातील तीन ते चार डॉक्टरकडेही तपासणी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामूळे हे डॉक्टरही तपासणीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

अमळनेर : झामी चौक परिसरातील पती- पत्नी असलेल्या दोन जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यात महिलेचा मृत्य झाला असून, तिच्या पतीवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात तीन जण कोरोना बाधित झाले असून, अमळनेर आता 'हॉटस्पॉट' बनू पाहत आहे. 

क्‍लिक कराः  हजारो सिकलसेल रुग्णांचा जीव टांगणीला...गोळ्या पुण्यात अडकून
 

काही डॉक्टरही तपासणी फेऱ्यात
अमळनेर तालुका हादरला असून, प्रशासनाने शहरातील एक किलोमीटर परिसर सील केला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आठ जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. अजून कोण संपर्कात आले होते त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.झामी चौक परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून, वैद्यकीय पथकाकडून 'होम टू होम' सर्वेक्षण सुरू आहे. 14 दिवस हे सर्वेक्षण तीन किलोमीटर परिसरात केले जाईल अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेने शहरातील तीन ते चार डॉक्टरकडेही तपासणी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामूळे हे डॉक्टरही तपासणीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

संचारबंदी कठोर करणार
मुंगसे (ता. अमळनेर) येथील एका महिलेचा अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आल्यानंतर शहरासह तालुक्यात तीन दिवस कठोर संचारबंदी लावण्यात आली होती. आज चौथा दिवस असून सकाळी नऊपासून दुपारी चारपर्यंत किराणा, भाजीपाला आदी विक्रीस परवानगी देण्यात आली होती. परिणामी बाजारात मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. त्यातच शहरातील दोन जणांचे कोरोना पॉसिटीव्ह अहवाल आल्याने प्रशासन पुन्हा संचारबंदीची कठोर अमलबाजवणी करण्याच्या तयारीत आहे. 

आर्वजून पहा :"कोरोना' लढ्यात आता शिक्षकांची मदत घेणार; काय आहे "कोविड गार्ड...

बाजार समिती आजपासून पुन्हा बंद
आजपासून बाजार समितीत खरेदी- विक्री सुरू करण्यात आली होती. कालपासूनच सुमारे 500 वाहने दाखल झाली होती. मात्र, शहरातील घटनेचे गांभीर्य पाहता व्यवहार बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, धान्याची वाहने दाखल झाली असल्याने सायंकाळपर्यंत व्यवहार सुरू होते. उद्यापासून (ता. 23) पुन्हा व्यवहार बंद करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. 
...तरीही नागरिक रस्त्यावर
शहरातील झामी चौक भागात दोन कोरोना पॉसिटीव्ह सापडल्यानंतर प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. मात्र, तरीही नागरिकांना गांभीर्य नसून नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे.

नक्की वाचा :"लॉकडाउन'मध्ये मद्य तस्करी...दुकानानंतर गुदामाचा परवानाही रद्द ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Amalner leads to 'Corona hotspot' Strict execution of communication barriers