भाजपचे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड : मंत्री गुलाबराव पाटील 

भाजपचे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड : मंत्री गुलाबराव पाटील 

जळगाव  : राज्यातील सरकारी अत्यंत चांगले काम करीत आहे. त्यामुळे ते जनतेच्या विश्‍वासालाही पात्र ठरले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला आता सरकारचे चांगले काम पाहवत नाही. त्यामुळे ते आंदोलन करीत आहेत. भाजपला आता बाजारात किंमत नसल्यामुळे चेहरे दाखविण्यासाठी त्यांनी आंदोलनाची ही जत्रा भरविली आहे. त्यांचे हे आंदोलन म्हणचे आता विझणाऱ्या दिव्याची फडफड आहे, असा टोला शिवसेनेचे उपनेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 

राज्यात "कोरोना' संसर्ग रोखण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपतर्फे राज्यभर "मेरा आंगण, मेरा रणांगण' आंदोलन आज करण्यात आले. यात राज्यभरातील नेत्यांनी सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून राज्य सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनावर राज्य मंत्रिमंडळातील पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तसेच शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी खरमरीत टीका केली. ते म्हणाले, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शासन व प्रशासकीय यंत्रणा "कोरोना'विरुद्धच्या लढाईचा मोठ्या धैर्याने मुकाबला करीत आहे.

राज्यात साडेदहा हजारांपेक्षाही अधिक रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे हे मोठे यश आहे. याशिवाय राज्यात "कोरोना'चे संकट असताना उन्हाळा आहे. अशा स्थितीत अनेक पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होतो, मात्र, प्रशासनाने व्यवस्थित उपाययोजना केली आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत एवढ्या मोठ्या संकटकाळातही जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी शासनाने सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तसेच मका खरेदी केंद्रही सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या या सरकारवर आज जनतेचा विश्‍वास आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला बाजारात किंमत उरली नसल्यामुळे जनतेला चेहरे दाखविण्यासाठी आंदोलनाची ही जत्रा भाजपने भरविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com