esakal | जळगाव-औरंगाबाद-बुलडाणा सीमेवर नाकाबंदी; अनधिकृत वाहनधारकांना चाप 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव-औरंगाबाद-बुलडाणा सीमेवर नाकाबंदी; अनधिकृत वाहनधारकांना चाप 

तोंडापूर ते फर्दापूर खानदेश, मराठवाडा व विदर्भ सीमेवर असल्याने या भागातून मलकापूर, बुलडाणा, शेगाव, भुसावळ या भागातील वाहतूक चोरट्या मार्गाने होत असते. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या परिसरातून नाकाबंदी करण्यात आली आहे. जामनेर तालुक्‍यातील लिहेताडा ते सोयगाव ग्रोदी ते सावळदबारा, वसंतनगर, बेटावद ते मोताळा अशा सहा ठिकाणी जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. 

जळगाव-औरंगाबाद-बुलडाणा सीमेवर नाकाबंदी; अनधिकृत वाहनधारकांना चाप 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तोंडापूर (ता. जामनेर) : तोंडापूर ते फर्दापूर (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) रस्त्यावर जामनेर तालुक्‍याच्या हद्दीत जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा हद्दीत सहा ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली असून, यामुळे अनधिकृत वाहनधारकांना चाप बसला आहे. 

तोंडापूरपासून फर्दापूर रस्त्यावर 6 किलोमीटर अंतरावर जळगाव -औरंगाबाद जिल्हा सीमा असून, या फर्दापूर जाणाऱ्या रस्त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार तहसीलदार जामनेर यांनी जामनेर तालुक्‍याच्या हद्दीत सीमेवर नाकाबंदीसाठी विस्तार अधिकारी रमेश दुसाने, हवालदार प्रदीप चौधरी, सरपंच सुरतसिंग जोशी, पोलिस पाटील विजय जोशी, तलाठी शिवाजी काळे, कोतवाल वाकोद यांच्या उपस्थितीत रस्त्यावर आडवे लाकडी खांब लावून जळगाव ते औरंगाबाद सीमा बंद करण्यात आल्या आहेत. 

नक्की पाहा : डायलिसीसचे रुग्ण जीवनमरणाच्या उंबरठ्यावर 


कडेकोट बंदोबस्त 
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. फर्दापूर (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथून फाट्यावरून व इतर लगतच्या गावातून वाहने या रस्त्याने जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश करण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने जामनेर तहसीलदार यांनी जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदीचे आदेश देऊन अधिकाऱ्यांना त्याठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहे. 

हे पण वाचा : परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल


सहा ठिकाणी नाकाबंदी 
तोंडापूर ते फर्दापूर हा खानदेश, मराठवाडा व विदर्भ सीमेवर असल्याने या भागातून मलकापूर, बुलडाणा, शेगाव, भुसावळ या भागातील वाहतूक चोरट्या मार्गाने होत असते. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या परिसरातून नाकाबंदी करण्यात आली आहे. जामनेर तालुक्‍यातील लिहेताडा ते सोयगाव ग्रोदी ते सावळदबारा, वसंतनगर, बेटावद ते मोताळा अशा सहा ठिकाणी जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. 

क्‍लिक करा : गोरगरीबांसाठी शिक्षकांनी उभारला "सानेगुरुजी अन्नदान स्वेच्छानिधी' 

विविध पथकांची नजर 
नाकाबंदीसाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, सकाळी 8 ते दुपारी 4 पथक प्रमुख रमेश दुसाने, तोंडापूर तलाठी शिवाजी काळे, कोतवाल व पोलिस पाटील तोंडापूर यांच्या तर 4 ते 12 ग्रामविकास अधिकारी अनंत वंजारी, शिपाई तोंडापूर रात्री 12 ते 8 अशोक वाळके कृषी मंडळ अधिकारी व गोपाळ ब्राम्हदे कृषी सहाय्यक याच्या नियुक्ती करण्यात आल्या असून, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकाची चौकशी करण्यात येत आहे अत्यावश्‍यक सेवा वगळता बाहेरच्या जिल्ह्यातील रिकाम्या फिरणाऱ्या वाहनांना परत पाठवले जात आहे. नाकाबंदीमुळे वाहनधारकांवर वचक बसला आहे.