"पॉझिटिव्ह' रुग्णामुळे समतानगर सील...संपूर्ण परिसर केला निर्जंतुक !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

मनपाच्या यंत्रणेला बोलावून सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून घेतली. संपूर्ण परिसरात स्प्रिंकलर मशिन आणि हॅण्डपंपाद्वारे सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून परिसर निर्जंतुक करून घेतला.

जळगाव ः शहरातील समतानगर परिसरात आज दुपारी एक महिला कोरोना "पॉझिटिव्ह' आढळून आल्यानंतर एकच खळबळ या परिसरात उडाली. महापौर भारती सोनवणे यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करून परिसर सील करून सूचना त्यांनी दिल्या. 

आर्वजून पहा : आता तरी "भाजप' एकनाथराव खडसेंना संधी देणार का ? 
 

समतानगर परिसरात राहणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मनपाची आरोग्य यंत्रणा लागलीच कामाला लागली. महापौर भारती सोनवणे देखील त्याठिकाणी पोचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नितीन बरडे, ज्योती चव्हाण, प्रशांत नाईक, डॉ. राम रावलानी, डॉ. विजय घोलप, डॉ. संजय पाटील यांच्यासह मलेरिया आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

क्‍लिक कराः रेशन दुकानांवर केशरी शिधापत्रीका धारकांना धान्य वाटप सुरू ! 
 

परिसरात केले सॅनिटायझेशन 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच नगरसेवक नितीन बरडे यांनी तत्काळ मनपाच्या यंत्रणेला बोलावून सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून घेतली. संपूर्ण परिसरात स्प्रिंकलर मशिन आणि हॅण्डपंपाद्वारे सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून परिसर निर्जंतुक करून घेतला. महापौर भारती सोनवणे यांनी सॅनिटायझेशन प्रक्रियेचा आढावा घेतला. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला राहत असलेल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यासाठी महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. 

चौदा जण क्वारंटाइन 
समतानगरातील महिला "पॉझिटिव्ह' आल्याने महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. महापालिकेचे दवाखाना विभागाचे पथक तत्काळ पोचले व संबंधित कोरोनाग्रस्त महिला कोणाच्या संपर्कात आली, त्यांना शोधून क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

नक्की वाचा : परप्रांतीय मजूरांना रेल्वेने दिला आधार... भुसावळ स्थानकावर भोजनाची व्यवस्था !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona 'positive' patient Samtanagar seal