जळगाव जिल्ह्यात 20 संशयितांचे नमुने निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. 

जळगावः जिल्ह्यातील एकूण 20 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालात पारोळा येथील 14 व्यक्ती, पाचोरा येथील 4 व्यक्ती, जामनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

क्‍लिक कराः विद्यार्थ्यांची घरवापसी चक्क घोड्यावरून

जळगाव येथील कोविड रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या 76 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्‍ट करण्यात आला आहेत. तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
या सात व्यक्तीमध्ये एक व्यक्ती (वय 40)अजिंठा चौफुली (जळगाव), एक 65 वर्षीय व्यक्ती (रा.अडावद, ता. चोपडा), एक व्यक्ती (वय 24, रा.पाचोरा), एक 24 वर्षीय महिला, एक (वय 30) व्यक्ती पाचोरा येथील तर अमळनेर येथील तीन व्यक्तीचा सामावेश आहे. त्यात 13 व 23 वर्षाचे दोन युवक, सोळा वर्षीय युवतीचा समावेश आहे. यापैकी जळगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.

आर्वजून पहा : जुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona supected 20 report nigetive