esakal | अरे बापरे...! हे काय...चक्क दररोज हे गिळतात 100 ग्रॅम धुळ ! 

बोलून बातमी शोधा

dust car jalgaon

अमृत योजनेची शहराला गरज होतीच. परंतू आता हीच अमृत योजना जळगाव शहरातील नागरिकांसाठी रोगापेक्षा ईलाज भयंकर अशी झालेली आहे. 

अरे बापरे...! हे काय...चक्क दररोज हे गिळतात 100 ग्रॅम धुळ ! 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शहरात अमृत योजनेमुळे खोदलेल्या खड्डयांमुळे सर्वत्र धुळ उडते आहे. नागरिकांच्या नाकातोंडावाटे रोज सुमारे 100 ग्रॅम धुळ त्यांच्या पोटात जाते आहे. यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. अमृत योजनेचे काम त्वरीत करावे, उडणाऱ्या धुळीवर उपाय करावा अशा मागणीचे निवेदन रविवारी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्‍विनी देशमुख यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले आहे. याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिले. 

आर्वजून पहा : पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 
 

केंद्र सरकारने जळगाव शहरासाठी अमृतयोजना मंजूर केली चांगले झाले. त्याची गरज ही होती कारण शहरातील पाईप लाईन आता जवळ-जवळ 30 ते 35 वर्षे जुनी झाली आहे. इतक्‍या दिवसात गंज लागून त्यातून पुर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे आता शक्‍य होत नाही. जुन्या पाईप लाईन मधून लिकेजच्या माध्यमातून 47 % प्रोसेस केलेले पाणी जमीनीत वाया जात आहे. त्यामुळे अमृत योजनेची शहराला गरज होतीच. परंतू आता हीच अमृत योजना जळगाव शहरातील नागरिकांसाठी रोगापेक्षा ईलाज भयंकर अशी झालेली आहे. 

आर्वजून पहा : अरेच्चा....! चोरट्यांनी पळविले रावेरचे पाणी
 

तत्कालीन सरकारने किंवा महापालिकेने हा विचार का नाही केला की, या योजनेमुळे शहरातील सर्व रस्ते खोदले जाणार आहेत. तेव्हा तेथुन माती बाहेर येणार आहे त्या मातीचे रुपांतर हे धुळीत व चिखलात होणार आहे. याचा नागरीकांना प्रचंड त्रास होऊ शकतो यातून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल. तेव्हा अमृत योजनेच्या ठेक्‍यामध्ये अशा अटी का नाही टाकल्या गेल्या की एक तर ही योजना कमीत कमी वेळा पूर्ण करा, नाहीतर खोदलेले रस्ते पुर्ववत डांबरी करण करुन द्या. जेणे करुन नागरीकांना त्रास होणार नाही. इतकी नियोजन शुन्यता अधिकारी व लोकप्रतिनिधी मध्ये कशी असु शकते? आज या धुळीमुळे जळगावकर त्रस्त झाले आहे. असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी सेल अर्बनच्या जिल्हाअध्यक्ष सौ. देशमुख, मुविकोराज कोल्हे, कल्पीता पाटील, युगल जैन, शुभम पाटील, मिलींद सोनवणे.

नक्की वाचा : केळी निर्यातीत भारत अव्वल ठरणार : के. बी. पाटील