आणखी नऊ संकुलातील गाळेधारकांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

भरणा केला आहे. त्यामुळे ज्या गाळेधारकांनी कमी रकमेचा भरणा केला अशा गाळेधारकांची यादी तयार करण्यात येत असून, सोमवारपासून गाळे सीलची कारवाई करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. 

जळगाव  : महापालिकेच्या मुदत संपलेल्या तीन व्यापारी संकुलानंतर आता उर्वरित संकुलातील गाळेधारकांना कलम 81 "क'ची नोटीस बजावण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यानुसार नऊ गाळेधारकांना महापालिकेने 81 "क' नोटिसा बजावल्या असून, थकीत रक्कम भरण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. थकबाकी न भरल्यास तसेच ज्या गाळेधारकांनी थकीत रकमेपैकी कमी रकमेचा भरणा केलेला आहे, अशा गाळेधारकांवरही कारवाईचे संकट आले आहे. 

नक्की वाचा :  अबब...काय सांगतात.. एकाच दिवशी पकडले की.. सात अजगर ! 
 

महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळ्यांची मुदत एप्रिल 2012 मध्ये संपुष्टात आली. थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने फेरमूल्यांकन करून महात्मा फुले, सेन्ट्रल फुले आणि जुने बी.जे. व्यापारी संकुलातील गाळेधारकांना 2012 ते 30 जून 2019 पर्यंतची थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी कलम 81 "क'च्या नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार काही गाळेधारकांनी पूर्ण थकीत रकमेचा भरणा केला, तर काही गाळेधारकांनी काही रकमेचा धनादेशाद्वारे भरणा केलेला असून, तीन व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून आतापर्यंत 84 कोटींची वसुली झाली आहे. 

आर्वजून पहा : भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप !
 

...या गाळेधारकांना नोटिसा 
महापालिका प्रशासनाने उर्वरित संकुलांतील गाळ्यांचे "रेडीरेकनर'नुसार फेरमूल्यांकन केले आहे. त्यानुसार चौबे व्यापारी संकुल, धर्मशाळा, नानाबाई अग्रवाल संकुल, रेल्वेस्थानक परिसरातील गाळे, शास्त्री टॉवर, भोईटे संकुल, वालेचा संकुल, श्‍यामाप्रसाद संकुल, डॉ. आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 "क'च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर महात्मा गांधी संकुल, भास्कर संकुल आणि छत्रपती शाहू महाराज संकुलातील गाळेधारकांना बजावण्यात येणार आहे. 

सोमवारपासून होऊ शकते कारवाई 
महापालिका प्रशासनाने महात्मा फुले, सेन्ट्रल फुले आणि जुने बी.जे. व्यापारी संकुलातील गाळेधारकांवर कलम 81 "क'अन्वये नोटीस देऊन गाळे सील करण्याची कारवाई केली होती. या तीनही व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी कमी रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे ज्या गाळेधारकांनी कमी रकमेचा भरणा केला अशा गाळेधारकांची यादी तयार करण्यात येत असून, सोमवारपासून गाळे सीलची कारवाई करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. 

क्‍लिक कराः  world kidney day : उच्चरक्‍तदाब, मधुमेहींना जडतोय किडनीचा विकार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jmc Municipal Term Expired Notice to the nine market