तो मोबाईलवर बोलण्यात मग्न... ती आली धडधडत अन्‌ गेली सुसाट ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

रेल्वे आऊटरवर थांबली असताना इतर प्रवाशांसोबत तरुण सोनी हा देखील खाली उतरून मोबाईलवर बोलत असताना मागून आलेल्या गोदान एक्‍स्प्रेस खाली येऊन त्याचा मृत्यू ओढवला.

जळगाव: भुसावळ- दुसखेडा दरम्यान रेल्वेचे काम सुरू असल्याने शनिवारी रेल्वेगाडी आऊटरवर दिड तास थांबली होती. रेल्वे ट्रॅकवरच थांबून असल्याने प्रवासी खाली उतरून शेजारील रुळावर मोबाईलवर बोलतांना ऐवढ्या गुंग झाला, की त्याला रुळावरून धडधड व सुसाट येणारी गोदान एक्‍स्प्रेस दिसलीच नाही. 
अन्‌ मग काय झाल्याचे नव्हते होत तरुणाला चिरडत पुढी निघून गेली. दोन दिवस उलटूनही मुलगा घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी खामगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार देत असतानाच भुसावळ रेल्वे पोलिसांनी खामगाव पोलिसांना फोन केला आणि घडल्या प्रकाराचा उलगडा झाला. तरुण विनोद सोनी (वय 22, रा.खामगाव) मृत तरुणाचे नाव आहे. 

नक्की वाचा : भिषण दुर्घटना; सोनगडजवळ तिहेरी अपघातात दहा ठार 
 

खामगावच्या किसाननगरातील रहिवासी तरुण विनोद सोनी (वय 22) हा पुणे येथील अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेत असून, खामगाव येथे मामाकडे वास्तव्यास होता. तो हिस्सार येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेला होता. तेथून शनिवारी सायंकाळी खामगावकडे परतत असताना भुसावळ पास केल्यावर तो प्रवास करीत असलेली रेल्वे दुसखेडा (ता. भुसावळ) येथे सिग्नल नसल्याने आऊटरवर थांबलेली होती. एक-दीड तासांपासून रेल्वे थांबलेली असल्याने गाडीतील प्रवासी खाली उतरून रेल्वे रुळावर थांबलेले होते. त्यांच्या सोबतच तरुण सोनी हा देखील खाली उतरला होता. मोबाईलवर बोलत असताना मागून गोदान एक्‍स्प्रेस (11059) सुसाट आल्याने त्यात तरुण सोनी चिरडला गेला. तद्‌नंतर भुसावळ रेल्वे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद होऊन त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू होता. मृत तरुणाच्या खिशातून मिळालेल्या आधार कार्डवरुन रेल्वे पोलिस उपनिरीक्षक बाबूलाल खरात यांनी खामगाव पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. 

आर्वजून पहा : भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून
 

मोबाईलने घेतला जीव 
रेल्वे आऊटरवर थांबली असताना इतर प्रवाशांसोबत तरुण सोनी हा देखील खाली उतरून मोबाईलवर बोलत असताना मागून आलेल्या गोदान एक्‍स्प्रेस खाली येऊन त्याचा मृत्यू ओढवला. दोन दिवस झाले मुलाचा मोबाईल लागत नाही व तो घरीही परतण्याचे संकेत नसल्याने कुटुंबीयांनी खामगाव पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यासाठी संपर्क केला. त्याचवेळेस खामगाव पोलिसांत भुसावळ रेल्वे पोलिसांनी फोन केल्याने प्रकरणाचा उलगडा होऊन व्हॉटस्‌ऍपवर तरुणचा फोटो त्याच्या नातेवाइकांना दाखवल्यावर त्यांनी जळगावकडे धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी आणि शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी मृताच्या नातेवाइकांना मदतीसाठी धाव 
घेतली. सोमवारी सायंकाळी तरुणाचे शवविच्छेदन होऊन मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. 

क्‍लिक कराः महाजनांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे हा...तगडा नेता उतरला मैदानात ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khamagaw studant train accidant dethe by duskheda tryak