esakal | फुकटच्या वीज वापरात 89 टक्‍के ग्राहक मोडणार 
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran

देशात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त वीजदर महाराष्ट्रात आहेत. घरगुती असो किंवा औद्योगिक, व्यावसायिक वीज दर हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. शिवाय, एप्रिलपासून वीज दरांमध्ये आणखी बदल होण्याची शक्‍यता आहे. घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना देखील अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत बिल येत असते.

फुकटच्या वीज वापरात 89 टक्‍के ग्राहक मोडणार 

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : राज्यातील वीज दर कमी करण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यांत नवे वीज धोरण आणले जाणार आहे. यात शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्‍यता आहे. हा निर्णय झाल्यास जळगाव परिमंडळ अर्थात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात मिळून 89 टक्‍के ग्राहक हे फुकटची वीज वापरणाऱ्यांमध्ये समाविष्ट होणार आहेत. यामुळे दर महिन्याला वितरित होणाऱ्या तीस कोटी रुपयांची बिले थांबतील. 

क्‍लिक करा - विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांचे काम चांगले : खडसे


देशात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त वीजदर महाराष्ट्रात आहेत. घरगुती असो किंवा औद्योगिक, व्यावसायिक वीज दर हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. शिवाय, एप्रिलपासून वीज दरांमध्ये आणखी बदल होण्याची शक्‍यता आहे. घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना देखील अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत बिल येत असते. बऱ्याचदा इतके बिल भरण्याची अडचण असल्याने थकीत बिलांची रक्‍कम वाढत असते. मात्र शासनाकडून शून्य ते शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा विचार सुरू असून, याची अंमलबजावणीत झाल्यास महागाईची वीज हा शब्द ग्राहकांच्या मुखातून दूर होईल. 

Women's Day : रात्रीचा दिन करत मुलांसाठी त्यांची "छाया'

दहा लाख 37 हजार ग्राहक 
जळगाव परिमंडळातंर्गत घरगुती वीज ग्राहकांची एकूण संख्या 11 लाख 58 हजार 315 इतकी आहे. या एकूण ग्राहक संख्येतील 0 ते 100 युनिट वीज वापर करणारे साधारण 10 लाख 37 हजार 429 (89 टक्‍के) ग्राहक आहेत. अर्थात शासनाचे शंभर युनिटपर्यंत मोफत वीज हे धोरण लागू झाल्यास 89 टक्‍के ग्राहक हे मोफत वीज वापरणाऱ्यांमध्ये येतील. 
 
मोफत तरीही येणार बिल 
"महावितरण'कडून खानदेशातील शून्य ते शंभर युनिट वीजकरीता साधारण तीस कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात येत असते. शंभर युनिटपर्यंत मोफत वीज या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास तीस कोटी रुपयांचे बिल थांबतील. परंतु, महावितरणकडून वीज पुरवठा करताना बिलामध्ये वेगवेगळे वीज आकार लावण्यात येत असतात. यात स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, विद्युत शुल्क, वीज विक्री कर आकारणी करण्यात आलेली असते. यामुळे मोफत वीज पुरवठा देण्याचे धोरण लागू झाल्यानंतर देखील बिलात लागणाऱ्या कर रक्‍कमेचे बिल ग्राहकांना भरावे लागणार आहे. 

आकडे बोलतात... 
जिल्हा..........एकूण ग्राहक...........0 ते 100 युनिट वापर ग्राहक 
जळगाव.......6,77,439.......... 6 लक्ष 10 हजार 139 
धुळे...........3,77,009.......... 2 लक्ष 72 हजार 284 
नंदुरबार.......1,73,167.......... 1 लक्ष 55 हजार 06 
एकूण..........11,58,315........ 10 लक्ष 37 हजार 429 (89 टक्के)