बाहेरून आलेल्यांची माहिती लपविण्यांवर गुन्हे दाखल होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

नागरिकांनी बाहेरुन आलेल्यांची माहिती प्रशासनाला तात्काळ कळवावी. माहिती सांगणाऱ्याची नावे गोपनीय ठेवली जातील.

जळगाव :  लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्याबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर अडकलेल्या विद्यार्थी किंवा मजुरांना येण्यासाठी शिथिलता शासनाने दिली आहे. परंतु कोरोना विषाणूच्या उपाययोजनेसाठी संबंधितांना वैद्यकीय तपासणी करुन घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शहरात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र शहरात येणारे नागरिक भीतीपोटी वैद्यकीय तपासणी न करता माहिती लपवीत आहे. 
त्यामुळे माहिती बाहेरून येणाऱ्यांची लपवून ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोडल अधिकारी तथा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी दिली आहे. 

क्‍लिक कराः अतिशय गंभीर...कोरोनाबाधित मृतदेहावरील पीपीई किट...फेकले जातात थेट उघड्यावर ! 

महापालिकेच्या हद्दीत किंवा जळगाव तालुक्‍यात परराज्यातून किंवा अन्य जिल्हायातून येणाऱ्या नागरिकांना प्रथम त्यांनी कोरोना बाबत तपासणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाने केली असून त्यासाठी महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेकर यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यावर जबादारी दिली आहे. 

बाहेरुन आलेल्यांनी भोईटे शाळेत एम. जे. कॉलेज जवळ सकाळी 11 ते 5 यावेळेत वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. आणि प्रशासनाला सहकार्य करून दक्षता घ्यावी. नागरिकांनी बाहेरुन आलेल्यांची माहिती प्रशासनाला तात्काळ कळवावी. माहिती सांगणाऱ्याची नावे गोपनीय ठेवली जातील. अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी उपायुक्त संतोष वाहुळे मोबाईल क्रमांक-9922334478 यावर संपर्क साधावा. 

नक्की वाचा :  "आयएमए'चे 250 डॉक्‍टर "कोरोना'त सेवा देणार : अध्यक्ष डॉ.दीपक पाटील 
 

तर गुन्हा दाखल करू ! 
जळगाव जिल्ह्यातून येण्यासाठी किंवा जाण्यासाठी आवश्‍यकतेनुसार परवानगी दिल्या आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीना नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकांचे आजारी असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक कारक आहे. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीत कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल. पण अनेक जण शहरात येवून देखील वैद्यकीय तपासणी 
करीत नसल्याचे बाब समोर येत असून अशांची माहिती लपवून ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोडल अधिकारी तथा उपायुक्तांनी दिला आहे. 

आर्वजून पहा : मातृदिनाला...आईने घेतला अखेरचा श्‍वास..नातवाचे मोबाईलवरुन अंत्यदर्शन !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon outsiders information those who hide Criminal charges against