आठ ठिकाणी मिळणार "शिवभोजन' 

shivbojan jalgaon
shivbojan jalgaon

जळगाव : शासनाने घोषित केलेल्या "शिवभोजन' योजनेची येत्या 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी जळगावातील वर्दळीची आठ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. या ठिकाणी केंद्र सुरू करण्यासाठी नऊ जणांनी अर्ज केलेले आहेत. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी दहा रुपयांत "शिवभोजन' योजनेची घोषणा केली होती. सत्तास्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारीचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे होते.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते. बैठकीत "शिवभोजन' केंद्राच्या ठिकाणांबाबत चर्चा झाली. यात शासन निर्णयानुसार वर्दळीच्या ठिकाणी हे केंद्र असावे, असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे "शिवभोजन' केंद्रासाठी जळगावातील वर्दळीची आठ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. 

नक्‍की पहा > सायकलिंगचा छंद मुलींसह पाच देशात प्रवास​
अशी आहेत आठ ठिकाणे 
जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीन, नवीन बसस्थानक परिसर, शासकीय रुग्णालय, रेल्वेस्थानक परिसर, गोलाणी मार्केट परिसर, तहसील कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय परिसर, शनिपेठ, बळिरामपेठ, रथचौक, भाजीबाजार परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती अशी आठ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. या ठिकाणच्या केंद्रांसाठी नऊ जणांनी जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज केले आहेत. प्रत्येक केंद्रासाठी 75 थाळी याप्रमाणे एकूण 700 थाळी जळगावसाठी मंजूर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com