जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुले जळगाव शहर... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी चा मेळा स्त्यावर उतरला होता महिलांची लक्षणीय उपस्थिती या शोभायात्रेचे वैशिष्ट होती तर पाचशे वर मुस्लिम महिला यांचा सहभाग होता. 

जळगाव ः शिवरायांचा जयघोष जिजाऊ मातेचा जयघोश संभाजीराजांचा हुंकार याने आसमंतात "शिवशक्ती' चा आभास निर्माण झाला होता. संपूर्ण शिवशाही रस्त्यावर उतरले की काय असे वाटत होते छत्रपती शिवरायांच्या बरोबर जिजाऊ आणि महिलांची फौजी याने स्त्रीक्तिचा जागर होत होता. सार्वजनिक शिवजयंती समिती तसेच लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनीक जयंती महोत्सव समितीने काढलेल्या मिरवणूकींमध्ये जाती, धर्म, पंथ, वंश लिंग, या सर्व भेदभावा पलीकडे जात शिवजयंती महोत्सव आज उत्साहात साजरा करण्यात आला. 

शिवजयंती महोत्सवाची सकाळी सार्वजनीक शिवजयंती समितीतर्फे सुरवात छत्रपतीच्या प्रतिमा पूजन आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे चेरमन अशोक जैन, महापौर भारती सोनवणे, सचिव सचिन पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, गफ्फार मलिक, मंगला पाटील, डी डी. बच्छाव यांनी केले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात 
झाली हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी चा मेळा स्त्यावर उतरला होता महिलांची लक्षणीय उपस्थिती या शोभायात्रेचे वैशिष्ट होती तर पाचशे वर मुस्लिम महिला यांचा सहभाग होता. 

नक्की वाचा : काढली छेड...अन्‌ मग काय झाला रुद्रावतार 

पालकमंत्री पाटील यांनी धरला ठेका 
लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनीक जयंती महोत्सव समितीतर्फे दुपारी चार वाजता क्रिडा संकुल येथून मिरवणूकीची सुरवात पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी प्रतिमा पुजन केल्यानंतर सुरवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापौर भारती सोनवणे, समितीच्या प्रतिभा शिंदे, फारुक शेख, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, विनोद देशमुख, माजी आमदार चंद्रकात सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणूकीची सांगता शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी आठ वाजता झाली. 

आर्वजून पहा : धक्कादायक...! पती समोरच झाला पत्नीवर अतिप्रसंग 
 

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अंगावर शहारे 
जळगाव शिवजयंती महोत्सवात सकाळी व सायंकाळी निघालेल्या दोन्ही मिरवणूकीमध्ये मराठी, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाण सहभाग होता. तसेच मिरवणूकीत विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, पथक झांज पथकाद्वारे आपलं पारंपारिक कला साजरी केली. योगा शिक्षिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी चौका-चौकात नयनरम्य योग प्रात्यक्षिक दाखवून प्रेक्षकांना अचंबित केले तर मल्लखांब व रोप-वे प्रशिक भोई सर यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रात्यक्षिक ने स्वास रोखायला भाग पाडले. तसेच विविध पथकातील तरुण, तरुणींनी तलावरबाजी, दांडपट्टा, काठी फिरवीण्याचे चित्तथरारक प्रात्याक्षीकांनी मिरवणूक बघणाऱ्यांचे अंगावर शहारे आणले. 

क्‍लिक कराः  तो नरभक्षक पून्हा आला...अन्‌ पसरली दहशत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivjayanti miravnuk