अरे हे काय...माय मराठीचा पेपर चक्क व्हॉटसअ्‌पवर व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

पहिला मराठी पेपरला सकाळी दहा पन्नासला पेपर वाटप करण्यात आली. काही मिनीटातच मराठीचा पेपरचे फुटीचे प्रकार समोर आला आहे. पेपरचे फोटो चक्क व्हॉटसअपवर व्हायरल झाला. 

जळगाव ः राज्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे आज पासून दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथे मराठीचा पहिलाच पेपर चक्क व्हॉटसअपवर व्हायरल झाल्याने पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार घडल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली. 

आर्वजून पहा : तो मोबाईलवर बोलण्यात मग्न... ती आली धडधडत अन्‌ गेली सुसाट !
 

राज्यात 18 फेब्रुवारीपासून बारावीचे पेपरला सुरूवात झाली. त्यानंतर दहावीचे सिबीएससीच्या अभ्यासक्रमाचे दहावीचे पेपर सुरू झाले. आज महाराष्ट्र राज्य बोर्डाचे संपूर्ण राज्यात दहावीच्या पेपरला सुरवात झाली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यातील कुऱ्हा काकोडा गावातील शिवाजी हायस्कुल 
शाळेत वेळेनूसार पहिला मराठी पेपरला सकाळी दहा पन्नासला पेपर वाटप करण्यात आली. काही मिनीटातच मराठीचा पेपरचे फुटीचे प्रकार समोर आला आहे. पेपरचे फोटो चक्क व्हॉटसअपवर व्हायरल झाल्याने जळगाव शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

नक्की वाचा :  चौपदरीकरणात काम कमी...तांत्रिक दोषच अधिक! 
 

आमच्या केंद्रातला प्रकार नाही - केंद्रप्रमुख 
दिलेल्या वेळेनूसार पेपरचे शिक्षकांना वाटप केले असून पेपर फुटल्याचा प्रकार आमच्या केंद्रात झालेला नाही. एका यूट्यूब वाहिनीच्चा प्रतिनीधीच्या मोबाईलवर पेपर फुटल्याच्या प्रकाराचे फोटो 11 वाजून 50 मिनीटाला आले आहे. आमच्या केंद्रातलेच हे फोटो असल्याचे पुरावे त्यांना मागितले. पण ते देवू शकले नाही असे शिवाजी हायस्कुल केंद्र प्रमुख रघुनाथ कौलकर यांनी "सकाळ'च्या प्रतिनीधीशी बोलतांना माहिती दिली. 

चौकशीनंतर गुन्हा दाखल करणार- माध्य. शिक्षणधिकारी 
कुऱ्हा-काकोडा घडलेल्या प्रकाराबाबत केंद्रसंचालक यांच्याकडून माहिती घेतली. यात केंद्रावर असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तरी देखील या केंद्रावर चौकशीसाठी गटशिक्षण अधिकारी यांचे पथक पाठविले असून चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी बी. जे. पाटील यांनी सकाळच्या प्रतिनीधीला माहिती दिली. 

क्‍लिक कराः अस्थिरतेमुळे सोन्याची बाजारपेठ मंदावली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tent Marathi paper goes viral on WhatsApp