तब्बल साडेतीन हजार नागरिक परराज्य, जिल्ह्यांतून जिल्ह्यात! 

तब्बल साडेतीन हजार नागरिक परराज्य, जिल्ह्यांतून जिल्ह्यात! 

जळगाव : केंद्र शासनाने राज्य शासनांना बाहेरील जिल्हे, राज्यांतील आलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे परराज्य, जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 3 हजार 553 जणांना येण्याचे परवाने मिळाले असून, हे आपापल्या सोयीनुसार जिल्ह्यात दाखल होत आहेत. 

जिल्हा प्रशासनाने सुटीच्या दिवशीही ऑनलाइन पद्धतीने परवाने देण्याची मोहीम राबविल्याने जळगाव जिल्ह्यात येणाऱ्यांची सोय झाली आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस असतानाही जिल्हा प्रशासन परवाने देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे प्रशासनाचे नागरिक आभार मानत आहेत. 

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती 
"लॉकडाउन'मुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरिकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यांमध्ये जायचे असेल, त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले होते. 

कार्यालयात गर्दी 
एक मेस आदेश निघाल्यानंतर शनिवारी (ता. 2) परजिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी आवश्‍यक लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी, ऑनलाइन परवानगी कशी घ्यावी लागते, याबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती. सुमारे दोन हजार नागरिकांनी आजअखेरपर्यंत ऑनलाइन अर्ज केले आहेत. 

जिल्ह्यात बाहेरील राज्यांतून, जिल्ह्यातून आलेले नागरिक 
राज्य/जिल्हा--संख्या 
गुजरात--3553 
राजस्थान-- 119 
मध्यप्रदेश - 40 
झारखंड - 8 
(बाहेरील जिल्ह्यातून आलेले - बुलडाणा- 9, धुळे - 98, नाशिक- 17, औरंगाबाद- 14 अशा एकूण 3 हजार 553 जणांचा समावेश आहे) 

अन्यथा कारवाई! 
बाहेरील राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्याबाबत तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलिसांना कळवायचे आहे, तसेच आल्यानंतर तालुक्‍यातील आरोग्य केंद्रातून स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावयाची आहे. स्वतः 14 दिवस "होम क्वारंटाइन' व्हायचे आहे. असे न करणाऱ्या व्यक्तींची माहिती गावातील नागरिकांनी प्रशासनाला कळवायची आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील. बाहेरून येणाऱ्या व्यक्ती अशी बाब करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 993 जणांना पास 
जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरिक, विद्यार्थी, पर्यटकांना बाहेरील जिल्ह्यात, राज्यात जायचे आहे अशा 2 हजार 383 जणांनी ऑनलाईन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते. त्यापैकी 993 जणांना पासेस देण्यात आल्या आहे. बाहेरील जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांची परवानगी लागते. त्यांनी होकार दिल्यानंतरच आपल्या जिल्ह्यातून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 648 जणांची अर्ज नाकारले आहेत, तर 742 जणांचे अर्ज प्रलंबित आहे. नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे त्यांची टीम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com