माथेफिरुने पेटविली दुचाकी ; स्फोटासारख्या आवाजाने रहिवाशांची धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

स्फोटाचा आवाज आल्याने तिवारी कुटुंबीयांनी घराबाहेर येऊन बघितले असता घराबाहेर उभी स्कुटी पेटत होती. कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझविली.

जळगाव  : चौगुले प्लॉट भागातील रहिवासी आशिष कैलास तिवारी (वय 27) यांची दुचाकी अज्ञात माथेफिरूंनी पेटवून दिल्याची घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी स्फोटासारखा आवाज झाल्याने परिसरातील रहिवासी घराबाहेर पडल्यावर घडला प्रकार समोर आला. दरम्यान, अशीच घटना तीन दिवसापूर्वी गेंदालाल मिल परिसरात घडली होती. 

नक्की वाचा : भिषण दुर्घटना; सोनगडजवळ तिहेरी अपघातात दहा ठार 
 

चौगुले प्लॉट भागात आशिष कैलास तिवारी (वय 27) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची दुचाकी सुझुकी एक्‍सेस (स्कुटी क्रमांक : एमएच 19, एडब्लू 2399) मारुती मंदिराजवळील त्यांच्या घराबाहेर उभी होती. पहाटे एकच्या सुमारास स्फोटाचा आवाज आल्याने तिवारी कुटुंबीयांनी घराबाहेर येऊन बघितले असता घराबाहेर उभी स्कुटी पेटत होती. कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझविली. याप्रकरणी आशिष तिवारी यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाहने पेटविण्याच्या प्रकारामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्‍यता वर्तवली जात असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

आर्वजून पहा : भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून
 

वैयक्तिक वादाचा संताप वाहनांवर! 
वैयक्तिक वादाचा संताप घराबाहेर उभ्या वाहनांवर काढण्याचे प्रकार वाढत असून, वाहन पेटविल्याच्या घटनेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल होतो. मात्र, संशयित शोधण्याची तसदी पोलिस घेत नाही. ज्या गुन्ह्यात संशयित सहज मिळूनही आला तरी, पोलिस त्याला न्यायालयात हजर करण्यापुरते काम करून मोकळे होतात. अशा घटनांमुळे शहरात दंगलीसारख्या घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, गेंदालाल मिल भागात किरकोळ वादावरून शनिवारी (ता.29) शुभांगी सोनवणे यांची दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार घडला होता. 

क्‍लिक कराः महाजनांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे हा...तगडा नेता उतरला मैदानात ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two bike faire by Mathefiru