तरूण- तरूणींनी भरदिवसा हे काय केले... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

दुपारी तीनच्‍या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधलेला काळा चष्मा लावलेला गिरीश सपकाळे याने साईविहार अपार्टमेंटमध्ये बी- ६ यात रहिवास करणाऱ्या दिया गॅस एजन्सीच्या संचालिका वैशाली नितीन पाटील यांना आबा घरी आहेत का? असा प्रश्न विचारून चौकशी केली. त्यावेळी वैशाली पाटील यांनी कामानिमित्त धुळे येथे गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर तो परत माघारी गेला.

चोपडा : चोपडा शिरपूर जुना रोड लगत असलेल्या साई विहार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुण- तरुणी यांनी घरात प्रवेश करून मिरचीची पूड असलेला स्प्रे डोळ्यात मारून लुटमारीचा प्रयत्न केला. मात्र, घरात असलेल्या महिलांनी या दोघांशी झटापटी करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तर घरात काम करणाऱ्या महिलेने गॅलरीत जाऊन चोर-चोर असा आवाज दिल्याने अपार्टमेंटमधील रहिवासी गोळा झाले. त्यावेळी दुचाकीवरून पसार होताना आरोपींना पकडून चोप दिला. ही घटना दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. गिरीश रवींद्र सपकाळे (वय २४, रा. आहुजा नगर, जळगाव) आणि डिंपल हेमंत कोळी (वय १९, गायत्रीनगर, जळगाव) असे आरोपींचे नावे आहेत. 
या घटनेचे वृत्त चोपडा शहर पोलिस ठाण्यामधील पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांना कळल्यानंतर त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या दोघेही महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे, वेलचंद पवार, रत्नमाला शिरसाठ, शेषराव तोटे, ज्ञानेश्वर जवागे, प्रमोद पवार, हेमंत कोळी, मनोज पारधी, प्रकाश मथुरे, संदीप निळे, प्रदीप राजपूत यांच्या पथकाने या दोघा तरुण- तरुणींना पोलिस ठाण्यामध्ये नेऊन त्यांना पब्लिक मार पडल्याने लगेचच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. घटनेचे वृत्त समजतात उपजिल्हा रुग्णालयात ही बघ्यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे गिरीश सपकाळे याचे वडील व डिंपल कोळी हिची आई शासकीय सेवत आहे. पोलिसांनी तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे चाकू, मिरचीची पुड असलेला स्प्रे, चिकट पट्ट्या व इतर साहित्य मिळून आले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. 

हेही वाचा > थरार...पाडत ठेवत रस्ता अडविला अन्‌ 

अशी घडली घटना 
येथे दुपारी तीनच्‍या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधलेला काळा चष्मा लावलेला गिरीश सपकाळे याने साईविहार अपार्टमेंटमध्ये बी- ६ यात रहिवास करणाऱ्या दिया गॅस एजन्सीच्या संचालिका वैशाली नितीन पाटील यांना आबा घरी आहेत का? असा प्रश्न विचारून चौकशी केली. त्यावेळी वैशाली पाटील यांनी कामानिमित्त धुळे येथे गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर तो परत माघारी गेला. आणि पाऊण तासानंतर एक मास्क बांधलेली व डोळ्यावर काळा चष्मा असलेली तरुणी (डिंपल कोळी) आली. तिने तुमचे बँक अकाउंट ‘एचडीएफसी‘ बॅंकेत आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर ती घरात आली आणि सोफ्यावर बसली. तिने बाहेर खूण केल्यानंतर लागलीच तो तरुण घरात आल्याबरोबर त्याने वैशाली पाटील यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. यावेळी वैशाली पाटील व दोन्ही आरोपींमध्ये झटापट सुरू असताना त्यांचा १२ वर्षाचा प्रणीत नावाच्या मुलाने हे पाहिल्याबरोबर त्याने आरोपीची लाथ पकडून ठेवली. आईला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी आरोळ्या मारल्या. मात्र, त्या कुणालाच ऐकू येत नव्हत्या. त्यांच्याकडे काम करणाऱ्या लताबाई सुका पाटील ही गॅलरीमध्ये भांडी धुत होती. तिला आरोळी ऐकू आल्यानंतर तिने गॅलरीचा दरवाजा बाहेरून बंद करून रस्त्यावर जाणाऱ्यांना चोर- चोर अशी आरोळी मारली. त्यावेळी अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांनी त्यांना पकडले आणि चोप दिला. 

अधिक वाचा > बाहेरगावी गेले तरी घरावर नजर ठेवण्याची शक्‍कल

प्रणितने दाखविले शौर्य 
एक अनोळखी तरुण, तरुणी घरात येऊन आईच्या डोळ्यावर स्प्रे मारला व आईचे मंगळसूत्र तोडले. हे प्रणितच्या लक्षात येताच त्याने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा पाय घट्ट धरून ठेवला. त्यानेही आरोळ्या मारल्या हे ऐकून झटापटीत मंगळसूत्र तुटले. यावेळी आरोपी गिरीश सपकाळेने ‘माऊ चल...‘ असे म्हणत दोन्ही पळून जात होते. मात्र, त्यांना अपार्टमेंटमध्ये खाली पकडण्यात आले. वैशाली पाटील यांच्या फिर्यादीवरून गिरीश रवींद्र सपकाळे व डिंपल हेमंत कोळी यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होत आहे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young boy and girl robury road