esakal | गुणवत्ताधारक विद्यार्थी दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित 
sakal

बोलून बातमी शोधा

गुणवत्ताधारक विद्यार्थी दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित 

जिल्हानिहाय किमान शंभर विद्यार्थ्यांची गुणवत्तानिहाय शिष्यवृत्तीसाठी निवड होते. दोन वर्षांपासून दहा हजारांवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही.

गुणवत्ताधारक विद्यार्थी दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी अद्याप घोषित होण्यास अवकाश आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यास सलग तीन वर्षे प्रतिवर्ष हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते. मात्र, दोन वर्षांपासून राज्यातील दहा हजारांवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त आहे. दोन्ही वर्षांची शिष्यवृत्ती तत्काळ देण्यासाठी प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

आवश्य वाचा- सातबारा उताऱ्यांवरील चुकांचा‘सिलसिला’थांबेना !
 

साठ वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिक स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्हानिहाय किमान शंभर विद्यार्थ्यांची गुणवत्तानिहाय शिष्यवृत्तीसाठी निवड होते. दोन वर्षांपासून दहा हजारांवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. शिष्यवृत्तीसाठी सुमारे एक कोटीची तरतूद होणे आवश्यक आहे. 

शिष्यवृत्तीत वाढ हवी 
पाच वर्षांपासून वार्षिक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. यात वाढ करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. यासाठी दीपक पाटील (कापडणे), राकेश पाटील (नगाव), भैरुलाल पाटील (नगाव), हंसराज कदम (धमाणे) समाधान पाटील (फागणे) आदी निवेदन देणार आहेत. 

खरोखर शिक्षणाकडे लक्ष आहे का? 
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आठ महिन्यांनंतर लागला. निकाल लागण्याअगोदरच पुढील परीक्षेचे वेळापत्रक घोषित झाले. दोन-तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही. शासनाचे खरोखर शिक्षणाकडे लक्ष आहे का, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे. 

वाचा-चाचण्या निम्म्यावर कारण, रुग्णसंख्या घटली 


मी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेत आलो. आता नववीत पोचलो, पण एकदाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. मला वेळेवर शिष्यवृत्ती मिळायला हवी होती. मी शिष्यवृत्तीची रक्कम गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी देत असतो. 
-सुयोग जगदीश पाटील, राजे संभाजी विद्यालय, देवपूर, धुळे 

संपादन- भूषण श्रीखंडे