धुळे जिल्ह्यात नदी-नाले बंधारे खोलीकरणाला ब्रेक ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात नदी-नाले बंधारे खोलीकरणाला ब्रेक ?

धुळे जिल्ह्यात नदी-नाले बंधारे खोलीकरणाला ब्रेक ?कापडणे : जिल्ह्यात पाणी फाउंडेशन (Water Foundation) तर्फे विविध गावा शिवारातील नदी-नाले बंधारे (Rivers and streams) खोलीकरणाच्या कामाला तीन वर्षांपासून गती मिळाली होती. त्याच बरोबर जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था खोलीकरणाच्या कामाला हातभार लावत होत्या. यामुळे जिल्ह्यात सिंचनाचे (Irrigation) प्रमाण वाढत होते. गेल्या वर्षांच्या मार्चपासून खोलीकरणाच्या कामाला ब्रेक (Deepening work break) बसला आहे. ही कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून (farmer) होत आहे.


(dhule district rivers streams deepening work break)

हेही वाचा: जिवाशी खेळ सुरूच..खासगी बसमधून प्रवाशी वाहतूक सुरूच

धुळे जिल्ह्यात राज्यपातळीवरील पाणी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने मोठ्या प्रमाणात 'पाणी थांबवा पाणी आडवा पाणी जिरवा' या संकल्पनेला जोड दिली होती. ती राबविण्यासाठी प्रत्येक गावातील स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले होते. स्पर्धेच्या माध्यमातून गावे पाणीदार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. तीन वर्षात मोठ्या प्रमाणात खोलीकरणाची कामे झाली. आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर कृतज्ञता ट्रन्टच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात कामे झालीत.

हेही वाचा: अंगणात सरडा फेकल्‍याचा संशय; वहिनीवर कुऱ्हाडीने वार


गेल्या वर्षाच्या मार्चपासून कोरोना लॉक डाऊन सुरू झाले. उन्हाळ्यातील खोलीकरणाच्या कामाला पूर्णविराम मिळाला. यावर्षीही मार्च पासूनच लाॅक डाऊन सुरू आहे. खोलीकरणाची कामे सुरू झाली नाहीत. वास्तविक नदी नाले बंधारे खोली करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लॉक डाऊन ची अडचण नव्हती. मात्र याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी कानाडोळा केला असल्याचे चर्चिले जात आहे. दरम्यान जिल्ह्यात सलग पाच वर्षे नाले बंधारे खुली करण्याची कामे सुरू राहिल्यास पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. सिंचनाच्या टक्का शंभरावर पोहोचणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची जागरूकता व लोकप्रतिनिधींची सहजगता आवश्यक आहे.

loading image
go to top