महाकाय वटवृक्षाला जीवदानासाठी धडपड सुरू 

दिनेश पवार
बुधवार, 4 मार्च 2020

शहादा ते मंदाणे - वडगाव - शहाणे - मालकातर या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. या रस्ता कामात अनेक झाडे येत असल्याने ते तोडण्यात येत आहेत. आता वनविभागानेही वृक्षतोडीस परवानगी दिल्याने गेल्या १० - १५ दिवसापासून वृक्षतोड सुरु आहे. त्यातून हा वटवृक्ष वाचावा अशी ग्रामस्थांना आशा आहे. 

मंदाणे : शहादा- मंदाणे राज्यमार्गाचे रुंदीकरण वेगाने सुरु असून या मार्गावरील पिंपर्डे गावाजवळील तीनशे वर्षापासून हजारो वाटसरूंना सावलीची ऊब देणारा महाकाय वटवृक्ष लवकरच शेवटचा श्‍वास घेणार आहे. पिंपर्डे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी हे वृक्षमंदिर वाचविण्यासाठी धडपड चालवली आहे. त्याची दखल घेत या वृक्षाला जीवदान देण्यात यावे अशी मागणी होत आहे. 

 क्‍लिक कराः साकेगावचा उड्डाणपूल वाहतूकीस खूला 

या वटवृक्षाची कत्तल करू नये यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांनी जागाही देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. पिंपर्डे गाव शिवारात असलेला हा वटवृक्षाजवळच पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील विहिर देखील आहे. गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या वृक्षाच्या छायेत तिन - चार पिढ्या खेळल्या- बागडल्या आहेत. या महाकाय वटवृक्षावर पोपट, वटवाघुळे, बगळे, कावळे, मधमाशांचे पोळे असे असंख्य पक्षी विसावलेले असतात. हाच वटवृक्ष मोठ्या प्रमाणात प्राणवायूचीही निर्मिती करतो. पौराणिक व धार्मिकदृष्ट्याही महत्व या वृक्षास आहे. 

आर्वजून पहा : पोलिस ठाण्यासमोर अंधार...आणि पोलिसदादा अडकला सापळ्यात ! 

वट पौर्णिमेनिमित्त पंचक्रोशीतील कित्येक महिला मोठ्या श्रद्धेने या वटवृक्षाची पूजाअर्चा करीत नवस मानतात. हा आठवणींचा ठेवा आता रस्त्याच्या कामात अडथळा ठरला आहे. शहादा ते मंदाणे - वडगाव - शहाणे - मालकातर या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. या रस्ता कामात अनेक झाडे येत असल्याने ते तोडण्यात येत आहेत. आता वनविभागानेही वृक्षतोडीस परवानगी दिल्याने गेल्या १० - १५ दिवसापासून वृक्षतोड सुरु आहे. त्यातून हा वटवृक्ष वाचावा अशी ग्रामस्थांना आशा आहे. 

बाजूची जागा देण्यास शेतकरी तयार 
याच मार्गावरील कर्जोत ते पिंपर्डे दरम्यान रस्त्याला लागूनच हे सर्वा मोठे वडाचे झाड आहे. हजारो पांथस्थांना आश्रय देणारे व भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले हे वृक्षमंदिर तोडले जाऊ नये अशी नागरिकांची मागणी आहे. हे झाड तोडले जावू नये याबाबत विनंती करणारे निवेदनही काही जागरुक नागरीकांनी संबंधीताकडे दिले आहे. झाड वाचविण्यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागाही देण्याची तयारी दर्शविली आहे. 

नक्की वाचा : जळगावातून हैद्राबाद, जयपूर, पुण्यासाठीही "उडान' शक्‍य 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mandane Widening of the Mandane State Highway epic tree life