महाविकास आघाडी, भाजपच्या नेत्यांचा लागणार कस 

mahaVikas aaghadi
mahaVikas aaghadi


शहादा : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली विधान परिषद निवडणूक आयोगाने दिवाळीच्या आतषबाजीनंतर जाहीर केली आहे. या निवडणुकीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरळ लढत असली, तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान मात्र कायम आहे.

धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसावी लागेल. 

धुळे-नंदुरबार विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्या वेळी त्यांची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर निवडणूक जाहीर झाली. १ एप्रिलला होणारी निवडणूक कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. अर्ज माघारीनंतर भाजपतर्फे अमरिशभाई पटेल व महाविकास आघाडीतर्फे नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजित पाटील हे दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांनी माघारीनंतर प्रचारही थांबविला होता. निवडणूक आयोग माघारीनंतरचा कार्यक्रम पुढे राबविणार असल्याने या दोन्ही उमेदवारांमध्ये सरळ लढत होईल. मतदान १ डिसेंबरला होणार आहे. यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. आहे त्या वेळेत सर्वांपर्यंत पोचावे लागणार आहे. 


राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. ‘सत्ता तिथे वलय’ या उक्तीप्रमाणे सध्या या पक्षांमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्या इन्कमिंगचा फायदा विधान परिषदेच्या निवडणुकीत होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, एकनाथ खडसे, नंदुरबारचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, आमदार कुणाल पाटील, पद्माकर वळवी, अनिल गोटे, तिन्ही पक्षांतील आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकत्रित मोट बांधावी लागणार आहे. 
भाजपने माजी आमदार अमरिशभाई पटेल यांना विधान परिषदेत उमेदवारी दिली आहे. त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपने त्यांना विधान परिषदेचे तिकीट दिले. पक्षांतर्गत कलह असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या जुन्या व नव्या सर्वांनाच एकत्रित काम करावे लागणार आहे. 

एकूण मतदार (धुळे-नंदुरबार) ः ४३८ 
धुळे ः २३८ 
नंदुरबार ः २०० 
पक्षीय बलाबल ः 
भाजप 
धुळे ः १६९ 
नंदुरबार ः ७० 
महाविकास आघाडी 
धुळे ः ६९ 
नंदुरबार ः १३० 
एमआयएम ः पाच 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com