esakal | शेतकरी आर्थिक संकटात..दादरला भाव मिळ ना !
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

शेतकरी आर्थिक संकटात..दादरला भाव मिळेना !

sakal_logo
By
अशफाक खाटीक

न्याहळोद : तीन हजार रुपये क्विंटल ने विकली जाणारी दादर ग्रामीण भागात चोदाशे ते पंधरा शे रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात असल्याने शेतकरी बांधवाना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे मागील वर्षी खरीप हंगामात पाऊस समाधान कारक झाल्याने रब्बी हंगामात विहिरीना मुबलक पाणी होते.त्यामुळे गहू, ज्वारी, दादर, मका ,बाजरी इत्यादी धान्य पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.

हेही वाचा: चोर तर चोर..वरून शिरजोर ! काळा बाजार करणाऱ्यांनी पोलिसांनाच केली मारहाण

इतर पिकांना हमी भाव मिळत नाही म्हणून शेतकरी दादर पिकाकडे वळला होता कारण धान्य ही ज्यादा भावाने विकला जातो तसेच कडबा विक्रीतूनही दोन पैसे मिळतात त्यामुळे चारा विक्रीतून पेरणीचा खर्च देखील निघत असतो व आलेल्या उत्पादनातून दोन पैसे जास्त मिळतात त्यामुळे या पिकाकडे कल जास्त होता. परंतु गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व आर्थिक गणिते बिघडली आहे चांगली प्रतीची दादर ही चौदाशे ते पंधरा शे रुपये दराने ग्रामीण भागात खासगी व्यापारी घेत आहेत त्यामुळे सध्या चारा ही कोणी घेत नाही दादर ला भाव नाही त्यामुळे काही दिवसांवर खरीपपूर्वी मशागतीची कामे येऊन ठेपली आहे ,शेती मालाला भाव ,नाही हातात पैसा नाही ,अशा वेळी पिकांना भाव नसल्याने नवीनच आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे तर दुसरीकडे मातीमोल दराने घेतलेला शेती माल दुप्पट किमतीने आज ही व्यापारी वर्ग विकतो आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करा !

खरे लाभार्थी कोण ?

मोठा वाजगाजा करीत सरकारने खरेदी विक्री संघामार्फत ज्वारी, दादर हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु नोंदणी ची क्लिष्ट पद्धत ,लॉक डाऊन मुळे शहरी भागात येण्यास वाहतूक नसणे तसेच आल्यानंतर ही नाव नोंदवलं जाईल की नाही याची शास्वती नाही तसेच टोकण घेतल्या नंतर हमखास शेतीमाल विकला जाईल की नाही याची शासवती नाही या सर्व कारणांमुळे मातीमोल भावाने आर्थिक नुकसान सहन करीत आहे परंतु खरेदी विक्री संघात नाव नोंदणी करून हमी भावाने शेत माल विक्री करून आर्थिक फायदा करून घेणारे खरे लाभार्थी कोण ठरणार आहे हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण ही घोषणा आजही खरी ठरताना दिसत आहे

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top