esakal | तापी दुथडी भरून वाहतेयं पण उपनद्या अद्यापही कोरड्या
sakal

बोलून बातमी शोधा

तापी दुथडी भरून वाहतेयं पण उपनद्या अद्यापही कोरड्या

तापी दुथडी भरून वाहतेयं पण उपनद्या अद्यापही कोरड्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ


सारंगखेडा : निसर्गावर अवलंबून असलेले नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी (farmer) सध्या विवंचनेत दिसत आहेत. जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पावसाला (Rain) सुरवात झालेली नाही. मात्र जिल्ह्यातील सर्वांत मोठी नदी असलेली तापी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. तापीच्या उगम आणि जोडणी क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे (Hatnur Dam) दरवाजे खुले करण्यात आले, पर्यायाने तापी पात्रात भरपूर पाणी आहे. मात्र तिच्या अनेक उपनद्या अद्यापही कोरड्या आहेत.(nandurbar district tapi overflowing but tributaries still dry)

हेही वाचा: धुळ्यात डेंगीचा उद्रेक; बालकांसह तरुण विळख्यात


तापी पात्रातील पाणी बघून शेतकरीराजा आनंदी होत पाऊस होत असलेल्या भागातील शेतकऱ्यांशी आनंदाने संवाद साधत आहेत. मात्र, दुसरीकडे परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊसच नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची झालर दिसत आहे. सारंगखेडा (ता. शहादा) परिसरात आतापर्यंत पाऊस अंधळी कोशिंबिरीचा डाव खेळत आहे. पाऊस कोठे बरसत आहे तर कोठे नुसतेच ढग दाटून येत आहेत. अद्यापही बहुसंख्य गावशिवारात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गावागावात वरुणराजा बरसावा म्हणून जागरणासह जोगवा मागितला जात आहे.

हेही वाचा: भुसावळ विभागातील ३६ रेल्वेगाड्या रद्द; १६,१७ ला वाहतूक बंद!

जोरदार पाऊसाची आवश्यकता
तापीच्या उगमस्थानी पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे १६ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पूर आला आहे. सारंगखेडा प्रकल्पाचे दहा दरवाजे मंगळवारी (ता. १४) पहाटे उघडल्याने पर्यायाने तापी दुथडी भरून वाहत आहे. मात्र परिसरात जोरदार पाऊसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट तर जीवदान मिळालेल्या पिकांच्या वाढी खुंटल्या आहेत.

हेही वाचा: हतनूर धरणाचे दहा दरवाजे बंद; पावसाने घेतली उसंत


तापीकाठावर पावसाची प्रतीक्षा
हतनूरसह सारंगखेडा प्रकल्पाचे पाणी सोडल्याने तापी नदी दुथडी वाहू लागली आहे. सारंगखेडा ते प्रकाशादरम्यान तापीकाठावरील अनेक गावांमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाची एकूणच स्थिती पाहता दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करताना आपले दुःख कसे व्यक्त करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे.

loading image