esakal | नंदुरबारला ई- भूमिपूजन कार्यक्रमात सत्ताधारी नगरसेवकांनी घातला गोंधळ !
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबारला ई- भूमिपूजन कार्यक्रमात सत्ताधारी नगरसेवकांनी घातला गोंधळ !

सत्ताधार नगरसेवकांनी आसनासाठी लवकर आले पाहिजे होते, असे सांगितल्याने थोडी शाब्दिक चकमक झाली. निमंत्रणपत्रिकेत नगरसेवकांचा उल्लेख नाही.

नंदुरबारला ई- भूमिपूजन कार्यक्रमात सत्ताधारी नगरसेवकांनी घातला गोंधळ !

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः पालिकेच्या नूतन इमारतीचे ई- भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या भाजपच्या नगरसेवकांसाठी आसन रिकामे नसल्याने ‘आम्ही कुठे बसावे’, असा प्रश्न उपस्थित करीत खालीच बैठक मांडून निषेध केला. कार्यक्रमपत्रिकेत नगरसेवकांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली. यामुळे काही वेळ कार्यक्रमस्थळी घोळ झाला. 


वाचा- प्रधानमंत्री आवास’लाही धुळे मनपाकडून ‘बट्टा’ ! -

पालिकेच्या नूतन इमारतीचा ई- भूमिपूजन कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी तीनला होता. त्यामुळे निमंत्रितांसह नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत आपले आसने सांभाळली. मात्र, चारच्या सुमारास भाजपचे नगरसेवक चारूदत्त कळवणकर, आनंदा माळी, मनोज चौधरी, गौरव चौधरी, लक्ष्मण माळी आदी त्या ठिकाणी आले. त्यांनी आसने शोधली. मात्र, कुठेही आसन खाली नव्हते. यामुळे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जेथे जागा मिळेल तेथे बसून घ्या, असे आवाहन केले. मात्र, आम्ही नगरसेवक आहोत, कार्यक्रम पालिकेचा आहे. त्यासाठी आलो. मात्र, आमच्यासाठी आसने नाहीत. हा आमचा अवमान आहे. मग आम्ही खाली बसतो, असे म्हणत नाट्यमंदिरच्या रस्‍त्यात बैठक मांडली. यामुळे थोडी धांदल उडाली.

सत्ताधार नगरसेवकांनी आसनासाठी लवकर आले पाहिजे होते, असे सांगितल्याने थोडी शाब्दिक चकमक झाली. निमंत्रणपत्रिकेत नगरसेवकांचा उल्लेख नाही. त्याचे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी द्यावे, असा आग्रह धरला. दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी व्यासपीठावरून खाली येत भाजपच्या नगरसेवकांना हा मुख्यमंत्र्यांचा शासकीय कार्यक्रम आहे. शांतता ठेवण्याची सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवकांची समजूत काढत बाहेर नेले. समजूत काढूनही भाजपच्या नगरसेवकांकडून वादाचे निमित्त शोधले जात असल्याचा आरोप करून बसायचे असेल तर बसा अन्यथा निघा, अशा शब्दांत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटवला. 

आवश्य वाता - तापीवरील ‘मेगा रिचार्ज स्कीम’ थंड बस्त्यात ! -


आमच्या पक्षाचे नगरसेवक जनतेच्या हितासाठी काम करीत आहेत. तरीही सत्ताधारी न्यायाने वागत नाहीत. आज नगरसेवकांना कार्यक्रमात बसायला जागा नाही. उलट त्याच नगरसेवकांना दमबाजी केली जाते, हा कोणता न्याय आहे. 
-डॉ. रवींद्र चौधरी, नेते, भाजप, नंदुरबार

संपादन- भूषण श्रीखंडे