भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला 

police heating
police heating

नंदुरबार : नवापूर महामार्गावर ट्रकचालक व काही नागरिकांचा वाद सुरु असतांना तो सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यास कोठडा (ता. नवापूर) येथील चौघांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजच्या सभेसाठी नवापूर बंदोबस्त आलेला होता, मात्र सभा रद्द झाल्याने काल (ता. १४) रात्री आठच्या सुमारास हा बंदोबस्त परतत होता. धुळे - सुरत महामार्गावर वाहनचालक उपेंद्रकुमार बद्रीप्रसाद राव (रा. डाताकुरूम, ता. पूलछूवा, झारखंड) व काही जणांमध्ये वाद सुरु असलेला त्यांना दिसला. यामुळे महामार्गावर वाहतुक ठप्प झाली होती. नवापूरकडे परत येत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक धिरज महाजन व पोलिस कर्मचारी जितेंद्र चव्हाण यांना हा प्रकार दिसल्याने ते घटनास्थळी गेले. कर्तव्य म्हणून ट्रकचालक उपेंद्रकुमार व उपस्थित वाद घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र समजून न घेता उलट चौघांनी श्री. महाजन, चव्हाण व ट्रकचालक उपेंद्रकुमार राव या तिघांना शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करुन दुखापत केली. महामार्गावरुन जाणाऱ्या काही वाहनधारकांनी तो वाद मिटवून जखमींना रुग्णालयात पाठवले. 
पोलिस कर्मचारी जितेंद्र चव्हाण यांनी नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे कमनलाल आवशा कोकणी, राकेश चिमनलाल कोकणी, रमणलाल आवशा कोकणी, विकास कमनलाल कोकणी (सर्व रा. कोठडा, पिंजरा नाला, ता. नवापूर) यांच्याविरुद्ध शासकिय कर्मचाऱ्यांना मारहाण व शासकिय कामाला अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांना कोंडून ठेवल्याची चर्चा 
नवापूर शहरात आज पुन्हा पोलिसांना मारहाण करीत कोंडून ठेवल्याची चर्चा होती. त्यानुसार गढी परिसरात काही जुगार अड्डे सुरू असल्याने पोलिस तेथे गेले असता संबंधित आठ ते दहा जणांनी त्यांना दार लावत कोंडून घेतले व मारहाण केली. यावेळी तेथील एका महिलेने पोलिसावर धाव घेत स्वतःचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. शहरभर ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने तर्कवितर्क सुरू होते. काहींनी हे प्रकरण मिटविले गेले असेही सांगितले. दरम्यान याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर पाडवी यांनी असा काहीही प्रकार घडलेला नसल्याचे सांगत उलट तेथील नगरसेवकाने संबंधिताना तुमचे अवैध धंदे असतील तरच पोलिस कारवाई करतील,ओरडता कशाला, पोलिसांना त्यांचे काम करू द्या असे सांगितल्याची माहिती दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com