मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमा प्रशासनाने सोडली वाऱ्यावर

लॉकडाउन असतानाही सर्व व्यावसायिक आपली दुकाने बिनदिक्कत उघडून जोमात व्यवसाय करीत आहेत.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमा प्रशासनाने सोडली वाऱ्यावर



ब्राह्मणपुरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही खेडदिगर (ता. शहादा) येथे नागरिकांची तुफान गर्दी असून, मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्हा पूर्णतः लॉकडाउन असल्याने खेतिया येथील नागरिक, व्यावसायिकांकडून महाराष्ट्रातील नियमांची सर्रास पायमल्ली सुरू आहे.

मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमा प्रशासनाने सोडली वाऱ्यावर
स्वातंत्र्य लढ्यात रावलापाणीच्या जंगलात घडले होते भयंकर; नविन आढळल्या खुणा !

मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्य सीमेवर असलेल्या खेडदिगर या गावात दिवसभर शेकडो नागरिक, व्यापारी बिनधास्त वावरताना दिसून येतात. शासनाने अत्यावश्यक वस्तूंसाठी वेळ दिला असला, तरी त्यासोबत इतर व्यावसायिकही जोमात आपले दुकान उघडून नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. लॉकडाउन असतानाही सर्व व्यावसायिक आपली दुकाने बिनदिक्कत उघडून जोमात व्यवसाय करीत आहेत.

मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमा प्रशासनाने सोडली वाऱ्यावर
पती-पत्नीचा गळा आवळून खून; दागिने पळवून केला दरोड्याचा बनाव

गुजरातचा आदर्श घ्यावा
गुजरातचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे. त्या ठिकाणी राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली असून, कोरोना संसर्ग होण्यास आळा घातला जात आहे. त्याउलट या सीमेवर मात्र सारा ‘आनंदीआनंद’ आहे. मध्य प्रदेश शासनाने बडवानी जिल्हा पूर्णतः लॉकडाउन केल्याने खेतिया येथील काही व्यापारी सरळ महाराष्ट्राच्या हद्दीत घुसून बिनदिक्कत आपला व्यवसाय चालवत आहेत. कोणाची तपासणी नाही की कोणाची विचारपूस नाही. आंतरराज्य सीमाही जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्याच्या स्थितीत दिसून येत आहे

मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमा प्रशासनाने सोडली वाऱ्यावर
धुळे जिल्ह्यात टँकसह चार ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची तयारी

अशी आहे स्‍थिती
* पोलिस प्रशासन बुजगावण्याच्या भूमिकेत, विनामास्क वावरणारे व काही अवैध धंदे बिनधास्त.
* स्थानिक स्वराज्य संस्थेने कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज.
* अत्यावश्यक वस्तूंसहित सर्वच व्यवसाय जोमात सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com