जवाईबापू म्हणतात सोने-चांदी नको, नको भांडे, कपडे;  द्या मला फक्त कांद्याचे रोप  

योगीराज ईशी
Friday, 2 October 2020

धोंड्याचा महिना सुरु असल्याने जावई बापु सोने,चांदी,व भांड्याच्या मागणीऐवजी चार वाफे कांदा रोपांची मागणी सोशल मीडियावर करत आहे

कळंबू  ः सध्या अधिकमास महिना सुरु आहे, याला ग्रामीण भागात धोंड्याचा महिना म्हणून संबोधले जाते. नविनच विवाह झालेल्या किंवा तीन वर्षात विवाह झालेल्यांसाठी हि एक पर्वणीच म्हणावी लागेल.याला ग्रामीण भागात जावयाला धोंड्याला बोलावणे असे म्हटले जाते, सध्या धोंड्याची लगबग सुरू असुन सोने,चांदी,भांडे, नविन कपडे जावयाला घेतले जात आहेत.

आवश्य वाचा- कोरोनाच्या‘रिकव्हरी रेट’मध्ये धुळे जिल्हा अव्वल 
 

पण सध्या शेतकऱ्यांसमोर ज्वलंत प्रश्न उभा राहीला आहे तो म्हणजे कांद्याचा रोपांचा, कारण मागील दीड दोन महिन्यापासुन सुरु असलेल्या पावसाने व बुरशीजन्य रोगाने शेतकऱ्यांचे कांदा पिक आणि कांदा रोपे पुर्णपणे नष्ट झालेले आहे, तेव्हा सोशल मिडियावर सध्या चर्चा रंगत आहे ती कांदा रोपांची ,सध्या धोंड्याचा महिना सुरु असल्याने जावई बापु सोने,चांदी,व भांड्याच्या मागणीऐवजी चार वाफे कांदा रोपांची मागणी सोशल मीडियावर करत आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराबरोबर शेतकऱ्यांचे मुसळधार पावसाने कंबरडे मोडले असले तरी भारतीय परंपरेत सण-समारंभ सत्कार, पाहूनचार , विधी ,मार्ग उपवास याला विशेष महत्त्व असून भारतीय परंपरा यामुळे जगात श्रेष्ठ तर आहेच शिवाय आदर्शव्रत अशीच मानली जाते.वसुदेव कुटुंबकम, अतिथी देवो भव:याच बरोबर समाजाला बरोबर घेऊन जाण्याची, जगण्याची परंपरा अगदी प्राचीन आहे. म्हणून धोंडा सन घरगुती वातावरणात सुरक्षित अंतर ठेवून राखला जात असला तरी शेतकऱ्यांचे मुख्य पीक व आहारी लागणारा कांदा हे असल्याने आजच्या तरुण पिढीला कांदा हे पीक महत्त्वाचे वाटत असल्याने त्याऐवजी ते सोने-चांदी भांडी ऐवजी ते कांदा रोपांची मागणी करत असल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आवर्जून वाचा-  सातपुड्याच्या कुशीत फुलली सेंद्रिय आवळ्याची शेती
 

सोशल मिडीयावर घराघरात चर्चा

 नुकतेच लग्न झालेल्या किंवा पहिल्या अधिकमासाला (धोंड्याला) जावयाला विशेष मान सन्मान देण्याची प्रथाही प्राचीन आहे त्यात प्रत्येक कुटुंब (सासू-सासरे) आप आपल्या ऐपतीप्रमाणे जावयाला कपडे, सोने भेट देण्याची प्रथा आहे. यासाठी पुरणपोळी ,मांड्याचे जेवण दिले जाते, मात्र कोरोना संकट असले तरी आज परंपरांना नियमांचे पालन करत सुरक्षित अंतर राखत घरच्या व्यक्तीच्या उपस्थितीत साजरा केला जात असला तरी यानिमित्ताने कांदा पीक व कांदा रोप यांची चर्चा सोशल मीडिया सह घराघरात चर्चेचा विषय ठरत आहे.

मला तीन जावाई आहेत, पण करोना मुळे व अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान व कापसाला भाव नसल्याने आम्ही यावर्षी फक्त लहान जावाईला वाण लावले तेही एक गंगाई व कपडे वगैरे दिले 
मोठे जावाई व दोन नंबरचे जावाईंनां पुढच्या तीन वर्षानंतर वाण लावू. 
- मिनाबाई महाले, देऊर ता. शहादा.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar month of Dhonda, farmer Son-in-law needs only onion seedlings