खासदार डॉ. हिना गावित विवाहबंधनात अडकणार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबंध होत असून त्यांचा साखरपुडा आज नंदुरबार येथे होत आहे.

नंदुरबार : नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबंध होत 
असून त्यांचा साखरपुडा आज नंदुरबार येथे होत आहे. डॉ. वळवी हे वैद्यकीय पदव्युत्तर असून ते मूळचे हातधुई (ता. धडगाव जि. नंदुरबार) येथील आहेत. मुंबईत ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. 

नक्की वाचा : दोन महिन्यांपासून ती होती बेपत्ता...पुन्हा चुकली रस्ता 
 

खासदार डॉ.हिना गावित यांचा जन्म 28 जून 1987 ला झाला असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस एमडी झाले आहे. त्यांचे वडील माजी मंत्री व व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आहेत डॉ. हिना या वैद्यकीय शिक्षण घेत असताना मार्च 2014 मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला व प्रथमच नंदुरबार लोकसभा निवडणूक लढवली. आणि त्यांनी कॉंग्रेसचे सलग नऊ वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा दणदणीत 1 लाख 6905 मतांनी पराभव करीत इतिहास रचला. त्या सर्वात तरुण आणि उच्च शिक्षित खासदार ठरल्या. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा 2019 मध्ये त्या भाजपकडून खासदार म्हणून निवडून आल्या. संसदीय कामकाज करताना त्यांनी आरोग्य तसेच कुपोषणाच्या विषयावर मुद्देसूद मांडणी करत संसदेचे लक्ष वेधून घेतले.

आर्वजून पहा : मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी

आदिवासी भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी उज्वला गॅस योजना अंतर्गत दीड लाखावर गॅस वितरण केले. खासदार गावित यांनी आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, न्यूझीलॅंड, सिंगापूर, इंग्लंड, स्वित्झर्लंड आदी देशांचे परदेश दौरे संसदीय मंडळाच्या बरोबर केले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत पंतप्रधान मोदी यांच्या गूड बुक मध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या संसदीय कामाची दखल घेत सलग पाचव्यांदा त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना वाचन भारतीय क्‍लासिकल संगीत ऐकणे तसेच आदिवासी भागात सामाजिक कार्य कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करायला आवडते. 

क्‍लिक कराः   video मुस्लिम आणि स्त्रियांना असुरक्षित वाटणे लज्जास्पद  : साहित्यिक भालचंद्र...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar MP Dr. Heena Gavit will get involved in marriage