esakal | अखेर... बॅरिकेटस् टाकत नवापूर शहर झाले सील ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर... बॅरिकेटस् टाकत नवापूर शहर झाले सील  ! 

शहरात ठिकठिकाणी रस्ते सील करण्यात आले. संचारबंदी असे पर्यंत सील राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शहरात येण्यासाठी कॉलेजजवळील रस्ता आणि बाजार समितीकडून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता ठेवला आहे.

अखेर... बॅरिकेटस् टाकत नवापूर शहर झाले सील ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवापूर : नंदुरबार शहरात कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानंतर येथील पालिका व पोलिस प्रशासन खाडकन जागे झाले. शहर संपूर्ण सील केले असून हालचाली होऊ शकतील अशा महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पोलिस तैनात करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी पोलिस ठाण्यात जमा होतील असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने नवापूरकर संचारबंदी अनुभवत आहेत. शहादा,नंदुरबार,तळोदा, प्रकाशा आदी ठिकाणी तीन दिवस पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

क्‍लिक कराः जिल्ह्यात रोहयोची वर्षभर पुरतील एवढी कामे जिल्हा परिषद मुकाअ. विनय गौडा
 

कोरोनाप्रश्‍नी थांबविण्यासाठी तहसीलदार उल्हास देवरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, निरीक्षक विजयसिंह राजपूत, प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र नजन, उपनगराध्यक्ष आरीफभाई बलेसरीया, विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, खलील खाटीक, हारूण खाटीक, फारूख शाह, माजी नगरसेवक अजय पाटील आदी उपस्थित होते. पोलिस, पालिका व महसूल यंत्रणा, पंचायत समिती गटविकास अधिकारी तालुक्यात कोरोनाचे संक्रमण कसे रोखता येईल यावर व्यापक चर्चा झाली. शहरातील कोरोना संभाव्य परिस्थिती कश्या पद्धतीने हाताळता येईल, नवापूर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने यासाठी नियोजन करण्याकडे लक्ष देत आहेत. 

नक्की वाचा :जळगाव जिल्ह्यातील बळिराजाला 400 कोटींचा फटका
 

असे असेल शहरातील बॅरिकेटींग 
शहरात ठिकठिकाणी रस्ते सील करण्यात आले. संचारबंदी असे पर्यंत सील राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शहरात येण्यासाठी कॉलेजजवळील रस्ता आणि बाजार समितीकडून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता ठेवला आहे. सार्वजनिक मराठी हायस्कूल जवळील रस्ता, शेतक-यांचा पीकमालाच्या गाड्या भाजीपालाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलीस वाहन यांचा प्रवेश राहणार आहे. अन्य सर्व खासगी वाहने, दुचाकी जाऊ शकणार नाहीत. दुचावर कुणी दिसला तर थेट पोलिस ठाण्यात जमा केली जाईल. कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील, नारायणपूर रोड, शांती मेडिकल, कुंभारवाडा, करंजी ओवरा ब्रिज, गांधी पुतळा, खाटकीवाडा, याभागात रस्ते बंद केले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, घरात थांबा,नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, पालिका प्रशासनाने केले. 

देर आये, पर दुरूस्त आये... 
काही भागात पोलीस बंदोबस्त करतील काही भागात वॉर्ड समितीचे स्वयंसेवक बंदोबस्त करणार आहेत. नगरसेवकानी प्रभागात जनजागृती केली असती तर बाजारात किंवा भाजीपाला मार्केट मध्ये गर्दी झालीच नसती. शहरात बहुपर्यायी मार्गावर बेरॅकेट सुरुवातीपासून लावणे गरजेचे होते. प्रशासनाला पंचवीस दिवसानंतर जाग आली असली तरी आता नागरिकांनी सहकार्य करणे आणि नगरसेवकांनीही आपापला प्रभाग शांत ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 
 

 आर्वजून पहा : "त्या'... कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकामुळे जिल्हावासीयांना टेंशन