धावत्या रेल्वेत प्रसुती कळा...सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे तिने दिला गोंडस बाळाला जन्म ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

रेल्वे पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भल्या पहाटे सतर्कता दाखवून परप्रांतीय महिलेची सुखरूप प्रसूती घडवून आणली. 

पाचोरा ः सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये संपूर्ण शासकीय यंत्रणा गुंतलेली आहे. रेल्वे प्रवाशी वाहतूक बंद असली तरी आठ दिवसांपासून श्रमिक रेल्वे धावत आहे. येथील रेल्वे पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भल्या पहाटे सतर्कता दाखवून परप्रांतीय महिलेची सुखरूप प्रसूती घडवून आणली. 

आर्वजून पहा : नाशिकहून रात्री आला; चिठ्ठीवर आई- वडीलांचा नंबर लिहून केले असे 
 

मुंबईहून मध्य प्रदेशात निघालेल्या श्रमिक रेल्वेतील क्रमांकाच्या डब्यातून एस-191297 कोच मधील क्रमांकाच्या सीटवरून गर्भवती महिला प्रवास करीत असून तिला प्रसूती वेदना होत आहेत, असा मेसेज पहाटे साडेतीनला येथील रेल्वे स्थानक अधीक्षकांना मिळाला. त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस सुभाष बोरसे यांना सूचित केले. श्री. बोरसे यांनी तत्काळ रुग्णवाहिका रेल्वे स्थानकावर मागवली. पहाटे वाजून मिनिटांनी ही श्रमिक रेल्वे पाचोरा येथे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थांबवण्यात आली. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील, कर्मचारी ए. एच. तडवी, पी. बी. दुशिंग व सुभाष बोरसे यांनी या कोचमध्ये जाऊन प्रसुती वेदना होणारी महिला रोशनी जगताप (वय 25) तिचा पती श्‍यामसुंदर जगताप व सासू लखाबाई जगताप यांना डब्यातून खाली उतरवले. हे जगताप कुटुंबीय बाबंदल (ता. सेंधवा, जि. बडवानी) येथील असून ते आपल्या गावी परतत होते. रेल्वे कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जगताप कुटुंबातील तिघांना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले व येथे प्रसुती वेदना होणाऱ्या रोशनी जगतापवर डॉक्‍टर व आरोग्य सेवकांनी उपचार केले. 

नक्की वाचा :  जळगावात येथे होता हायप्रोफाईल कुंटनखाना; महाविद्यालयीन युवतींना घेतले ताब्यात 
 

पहाटे तीला झाला गोंडस बाळ.. 
उपचार सुरू असताना पहाटे सहाच्या सुमारास रोशनी यांची प्रसूती होऊन गोंडस बाळाला तिने जन्म दिला. दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून माता व बालकाची प्रकृती ठणठणीत असल्याने श्‍यामसुंदर जगताप यांनी सांगितले. नातलगांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ते आपले वाहन घेऊन ग्रामीण रुग्णालयात आले त्यातून हे कुटुंब मार्गस्थ झाले. रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता व मानवता कौतुकास्पद ठरली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora railway safety personnel pregnet woman gives birth safely due to vigilance