esakal | कोरोना संकट जावे यासाठी संपूर्ण गाव रमले 'राम' नामस्मरणात

बोलून बातमी शोधा

 कोरोना संकट जावे यासाठी संपूर्ण गाव रमले 'राम' नामस्मरणात
कोरोना संकट जावे यासाठी संपूर्ण गाव रमले 'राम' नामस्मरणात
sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा : वारंवार कोरोनाच्या बातम्या ऐकून मानसिक संतुलन बिघडविण्यापेक्षा कोरोनादूतांसाठी, तसेच महामारीतील मृतात्म्यांना चिरशांती लाभावी व त्यांच्या परिवाराला जगण्याचे बळ मिळावे आणि कोरोनाला कायमस्वरूपी दूर ठेवावे या दृष्टिकोनातून सुजालपूर (ता. नंदुरबार) गावात श्रीरामनामजपाचा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविला जात आहे.

हेही वाचा: सतत..सातपुडा पेटतोय; जंगली प्राण्यांचा होरपळुन मृत्यू !

रामनामात मोठी शक्ती आहे हे रामायणातून मारुतीरायाने जगाला दाखवून दिले आहे. तसेच रामदास स्वामींनीही रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. तोच प्रकार सुजालपूर येथील ग्रामस्थांनी अवलंबून कोरोनाच्या कालावधीमध्ये घराबाहेर जाण्याऐवजी घरातच रामनामाचा जप करावा आणि आपले आध्यात्मिक जीवन सुयोग्य मार्गाला लावण्याबरोबरच कोरोनालाही कायमस्वरूपी दूर ठेवावे या दृष्टिकोनातून राम, रामचे नामस्मरण करण्याचे उपक्रम राबवीत आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे या वर्षीही सासुरवाशीणींची आखाजी होणार सासरीच..!

गावात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट सर्वत्र पसरले आहे. या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, वारंवार कोरोनाच्या बातम्या, चर्चा यांमुळे पुरुषांसह महिला वर्गाची मानसिकता खराब होत होती. या सर्वांना यातून बाहेर काढण्यासाठी गावात भगवंताचे नामस्मरण करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे सुजालपूर गावात घाबराटीचे वातावरण तयार झाले आहे. खास महिला वर्गात मानसिकता खराब करून घेतात व मन एकसारखे कोरोनाच्या बातम्या किंवा चर्चा ऐकून विचलित होत होते. त्यांचे मन वळावे व त्यांना भगवंताचे नामस्मरण व्हावे व आपला वेळ भगवंतांच्या नामस्मरणात जावा, तसेच गावावर व जगावर आलेल्या संकटाला घालविण्यासाठी डॉक्टर व मेडिकलची टीम देवदूत बनून काम करीत आहेच. पण श्रीराम नामस्मरण व वहीवर लिखाण करून संकटाचा नायनाट करण्याची ही विनंती भगवंतास करावी यासाठीच उपक्रम गावात सर्वसंमतीने सुरू केला आहे. जे लोक आपल्या सोडून गेले त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी व परिवारास जगण्याचे बळ मिळावे ही इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. परिसराचे ब्रह्मलीन संतश्री दगडूजी महाराज यांच्या प्रेरणेतून या उपक्रमास पुरुषांसह महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

हेही वाचा: मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन

गावात प्रत्येकाच्या घरी राम राम राम नावाचे लिखाण करून नामस्मरण करण्यात येत आहे. कोरोनाची भीती निर्माण झाल्यामुळे ती काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

प्रवीण पाटील, ग्रामस्थ, सुजालपूर (ता. नंदुरबार)

संपादन- भूषण श्रीखंडे