काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा गावांतील सरपंच, उपसरपंचांनी भाजपात केला प्रवेश 

कमलेश पटेल
Friday, 6 November 2020

मागील एका वर्षात मतदार संघातील प्रत्येक नागरिकांची सुख दुःख समजून घेतली. त्यामुळे लोकांच्या विश्वास वाढला आहे. मी नेहमी मतदारसंघात सहज उपलब्ध होत असतो.

शहादा : खानदेशात सद्या भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत एखनाथ खडसेंच्या मागे जात असल्याचे चित्र आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेर् हे भाजपात प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. आज शहादा तालुक्यातील तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्‍या विकासाच्‍या दूरदृष्टीवर विश्वास दाखवत तालुक्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सरपंच उपसरपंचांसह १० गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आवर्जून वाचा- मी शिवसेनेचा सोंगाड्या, खासदार पाटील यांना नाचविणार ! -

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष श्री. चौधरी म्हणाले की, आमदार राजेश पाडवी यांनी एका वर्षांत केलेल्या विकास कामांची पावती म्हणजे आजपर्यंत सुमारे हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. श्री पाडवी यांची जनतेशी असलेला संपर्क यामुळे मतदारसंघातील ग्रामपंचायतीत होणारा विकास कामांची गती पाहता अनेक ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या आहेत. 

आमदार श्री पाडवी म्हणाले की, मागील एका वर्षात मतदार संघातील प्रत्येक नागरिकांची सुख दुःख समजून घेतली. त्यामुळे लोकांच्या विश्वास वाढला आहे. मी नेहमी मतदारसंघात सहज उपलब्ध होत असतो. लोकांच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच मतदारसंघात अनेक विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. 

वाचा- गुजरात सीमेवरील सीमा तपासणी नाका बंद करा, मंत्री दिवाकर रावतेंना केली मागणी ! 

कार्यक्रम यशस्वितेसाठी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, सुनील चव्हाण, दंगल सोनवणे, पंचायत समिती सदस्य डॉ. विजय चौधरी, शहराध्यक्ष विनोद जैन, सचिन देवरे, ईश्वर पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष किन्नरी सोनार, नंदा सोनवणे, सरपंच अविनाश मुसळदे, सरपंच प्रकाश भाई, आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, अदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष सामरसिंग पावरा, सचिन पावरा, सुभाष वाघ, शहराध्यक्ष झुलाल मालचे, गोपाळ गांगुर्डे, दिलवरसिंग पावरा, किरण सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. 

यांचा झाला प्रवेश 
भुतेआकसपुरचे सरपंच मंगलाबाई ठाकरे, उपसरपंच योगेश मोरे, नवलपुर येथील विजयसिंग ठाकरे, सिताराम शेवाळे, उदयसिंग ठाकरे, सुभाष पावरा, नटवर पावरा. मालपुर येथील मोहन वळवी, सुदाम वाडी येथील कुवरसिंग राज्या, देईल रतनपुर येथील विनोद ठाकरे, केवढीपाणी येथील सायसिंग पटले, मानसिंग पावरा, जयराम पटले, मेंढ्यावर आमशा पाडवी, कुसुमवाडा येथील सरपंच सिंधुबाई पवार, उपसरपंच अनिता गणेश वाघ, संतोष पराडके, ग्रामपंचायत सदस्य चेतन ठाकरे, कांतीलाल शेळके, अलखेड येथील राजेंद्र पवार, दिनेश रामराजे आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shadada NCP-Congress sarpanch and deputy sarpanch from shahada taluka joined BJP