सोनगीर जामफळ प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना 269 कोटी 

एल. बी. चौधरी 
Friday, 4 December 2020

शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांना नवीन शेती घेेऊन पोट भरता येईल. म्हणून त्वरीत मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून करीत होते.

सोनगीर : तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरुन घेणारी योजनेतील बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना शेतजमिनीचा मोबदला एका महिन्याच्या आत मिळण्याची शक्यता असून त्यासाठी 269 कोटी रूपये प्रशासनाकडे आले आहेत. यासंंदर्भात चार अधिकारींची एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना पैैसे वितरित करण्यात येतील. 

आवश्य वाचा- सरपंच पदासाठी आता कोण..आरक्षणाची तयारी

जामफळ प्रकल्पालगतच्या शेती व अंतर्गत विहीरी शासनाने ताब्यात घेतल्या. प्रकल्पात शेतजमीन गेल्याने शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी रोजगार बुडाला. आहे. शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांना नवीन शेती घेेऊन पोट भरता येईल. म्हणून त्वरीत मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून करीत होते. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक चकरा मारल्या. आंदोलन, उपोषण व आत्मदहनाचा इशाराही दिला होता. बुधवारी (ता. 4) भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षणवर्गात पक्षाच्या शेतकऱ्यांनी भाजपाचे जिल्हानेते प्रा. अरविंद जाधव यांच्याकडे तक्रार केली.

 

खासदार सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. 4) शेतकऱ्यांसह प्रशासकीय अधिकारींची एक बैठक आयोजित केली. जिल्हाधिकारी संजय यादव, खासदार भामरे, प्रा. जाधव, शेतकरी आर.के.माळी, पराग देशमुख, कैलास वाणी, सुरेश वाणी, भटू धनगर, मोहन परदेशी, राजुलाल माळी, शाम माळी, लखन ठेलारी, दुला ठेलारी व महसूलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाचा- धुळ्यात थंडीचा कडाका; २३ दिवसांनी परतली लाट
 

सोंडले शिवारातील शेतीचा सर्व्हेनुसार व निवाड्यानुसार 269 कोटी रुपये निधी मिळाला आहे. शेती व शेतमालकांची खात्री करण्यासाठी चार अधिकारींची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जाईल. आयुक्तांनी मंजुरी दिली की त्वरीत शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला मिळेल यासाठी जास्तीत जास्त एक महिना लागेल असे प्रा. जाधव यांनी सांगितले. दरम्यान बाजारभावाच्या चारपट मोबदल्यापोटी पैसे मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

 

जामफळ प्रकल्पांतर्गत संपादित शेतीचा मोबदला मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून चकरा सुरू होत्या. अखेरीस त्यांच्या चिकाटीला यश आले असून खासदार सुभाष भामरे व प्रा. अरविंद जाधव, जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेतली. शेतकरी त्यांचे आभारी आहेत. आता लवकरात लवकर मोबदला मिळावा अशी अपेक्षा आहे. 
- पराग देशमुख, शेतकरी, सोंडले शिवार, सोनगीर

 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir ​​farmers under jamphal project to two hundred and sevent crored