esakal | पेरूच्या ‘उत्राण ब्रान्ड'ची बाजारपेठेत चलती! 
sakal

बोलून बातमी शोधा

पेरूच्या ‘उत्राण ब्रान्ड'ची बाजारपेठेत चलती! 

यंदा सतत झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे बागाचे मोठे नुकसान झाले. जो मार्केटला जाणारा माल होता तो गारपिटीने खराब झाल्‍याने कंपनीला १२ रुपये प्रति किलोदराने पोहोच करावा लागला. 
 सुरेश महाजन, शेतकरी

पेरूच्या ‘उत्राण ब्रान्ड'ची बाजारपेठेत चलती! 

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर महाजन

उत्राण (ता. एरंडोल) ः अतिवृष्टी गारपिटीने परिसरातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले. या परिसरात पेरूचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या पट्ट्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसून पीक खराब झाले. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात असून, खराब पेरू उत्पादकांनी काही कंपन्यांना विकला. त्यामुळे होणाऱे संभाव्य नुकसान कमी झाले. उत्राणच्या नावाने विकल्या जाणाऱ्या चांगल्या पेरूची बाजारात हंगामात मागणी टिकून राहिल्याने यंदा इतर नगदी पिकांच्या तुलनेत पेरू उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. 

सध्या परिसरात पेरूचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्‍याची मागणी अजूनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. १९९० पासून उत्राणचा पेरू प्रसिद्ध झाला. त्‍या काळात उत्राण गावातील निलॉन्‍स कंपनीचे मालकांनी पेरूची लागवड करून सुरवात केली. त्‍यानंतर हळूहळू गावात बागा वाढू लागल्‍या. त्‍या काळात दळणवळणाची सोय अपूर्ण होती. म्हणून कमी प्रमाणात बाजारपेठांपर्यंत पोहचविला जात होता. मात्र, आज पेरूला मोठी मागणी वाढली आहे. 

नक्की वाचा : पोटचा गोळा क्षणात गेला अन्‌ सुरू झाला मन हेलावणारा आक्रोश
 

परिसरातील हनुमंतखेडे सीम, भातखेडा, भातखंडे, तळई, परधाडे, दुसखेडा येथे खूप प्रमाणात लागवड आहे. मागील काही काळात चांगला पेरू बाजारात जायचा व पिवळा पेरू फेकण्यात यायचा. मात्र, सद्यःस्‍थितीत पेरूवर प्रक्रिया करणाऱ्या अनेक कंपन्या पुढे आल्‍या आहेत. त्‍यात जैन फार्म फ्रेश, फुड ॲड इन्‍स, अलाना फुड, मदर डेअरी आदी कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत असतो. मागील वर्षापेक्षा यावर्षी जुन महिन्‍यापासूनच पाऊस सतत सुरू राहिल्‍यामुळे पेरूची फूट कमी झाली होती. त्‍यामुळे मुंबई, बडोदा, सुरतसह स्थानिक बाजारपेठत पाचशे ते सहाशे रुपये दर प्रति २० किलोच्‍या कॅरेटला मिळाला. पिवळ्या पेरू मागच्‍या वर्षी आठ रुपये दर कंपनी पोहच होता. तो यावर्षी १२ रुपये किलो कंपनी पोहोच दर मिळाल्‍याने शेतकऱ्यांसह व्‍यापाऱ्यांचा मोठा फायदा झाला. या भागात धरणगाव, श्रीरामपूर येथील व्‍यापारी बागा खरेदी करतात. सद्यःस्‍थितीत वार्षिक कर पद्धतीने व्‍यवहार होत असतात. 

क्‍लिक कराः  सोने 72 तासांमध्ये 1700 रुपयांनी वधारले
 

माझ्याकडे सुमारे ८०० पेरूचे झाड आहे. मात्र, यावर्षी गारपीट झाल्‍याने मोठे नुकसान झाले आहे. मागच्‍या वर्षी मार्केटमध्ये चांगल्‍या प्रमाणात माल पोहोच केला होता. मात्र, मागच्‍या वर्षापेक्षा यावर्षी चांगला भाव होता. याशिवाय फळ प्रक्रिया कंपन्‍या माल खरेदी केल्‍यामुळे फायदा होत असतो. 
 अनिल महाजन, शेतकरी 

आर्वजून पहा : हातात "पाणी' घेवून पोलिसाची शपथ अन्‌ शांत झाला विवस्त्र कैदी... 
 

loading image
go to top