Nanadurbar News : नंदुरबार शहरावर ओढावणार पाणीबाणीचे संकट : आमदार चंद्रकांत रघुवंशी

Veerchak Dam
Veerchak DamesaKAL

Nanadurbar News : नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट होत आहे. यंदा पावसाने दांडी मारल्याने धरणात केवळ ६० टक्के जलसाठा पावसाळ्यात होता. त्यानंतर पाऊस झालेला नाही. मात्र पाण्याचा वापर सुरूच आहे.

त्यामुळे सोमवार (ता. २३) अखेर जलसाठ्यात लक्षणीय घट होऊन तो केवळ ३८ टक्क्यांवर आला आहे. (MLA Chandrakant Raghuvanshi statement of water shortage crisis in city nandurbar news)

त्यामुळे आजमितीस होणारा तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या वेळेतही बदल करण्यात येईल, आता पाऊस येण्याची आशाही मावळली आहे. त्यामुळे नंदुरबारकरांवरील पाणीबाणीचे संकट अटळ आहे. दरम्यान, नागरिकांनी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पाणी जपून वापरावे, असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

नंदुरबारला वीरचक धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी झराळी येथे फिल्टर प्लाँट पालिकेने कार्यान्वित केला आहे. तेथून शहराला पुरवठा होतो. धरण दर वर्षी पूर्ण क्षमतेने भरते. मात्र गेल्या वर्षीही पाऊस कमी झाला होता. तरीही अवेळी झालेल्या पावसामुळे ८० टक्क्यापर्यंत भरला होता. गेल्या वर्षी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या नियोजनामुळे शहराला कधी दोन दिवसांआड, तर कधी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करून पाणीटंचाईचे संकट टळले होते.

यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा होती. मात्र यंदाही पाईस झाला नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा झाला नाही. ठराविकच प्रकल्प पूर्ण भरले. नंदुरबार शहरासाठी जीवनवाहिनी असलेल्या शिवण नदीला यंदा मोठा पूरच आला नाही. शिवण नदीचा प्रवाह वेगाने वाहत येत असल्याने वीरचक धरण भरण्यास मदत होत होती. मात्र यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदीचा प्रवाह मंदावला.

Veerchak Dam
Nanadurbar Agriculture News : शेतकरी धास्तावला; पपईवर डाऊनी, मोझॅकचा प्रादुर्भाव

नदीतच पाणी नसल्याने सिंचन प्रकल्पात पाणी येईल कुठून? अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाअभावी वीरचक धरण केवळ ५६ टक्के भरला होते. त्यानंतर पाऊस नाही. मात्र शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचे संकट लक्षात घेऊन शहराला तीन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचा वापरामुळे धरणाची पातळी ३८ टक्के झाली आहे. त्यामुळे शहरावर पाणीबाणीचे संकट अटळ आहे. त्यामुळे कदाचित शहराला होणारा पाणीपुरवठा तीनएवजी चार दिवसांआडही होऊ शकतो. तसेच पाण्याची वेळ ४५ मिनिटावरही करावी लागेल.

नागरिकांनी मोटारी बंद कराव्यात

शहरात पाणी सोडले जाते, तेव्हा नागरिक मोटारी सुरू करून पाणी ओढतात. तसेच अनेक जण पाण्याचा अपव्ययही करतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व मदतीने जेव्हा पाणी सोडले जाईल, तेव्हा वीजपुरवठा तेवढ्या भागात बंद करण्याचे नियोजन आहे. म्हणजेच मोटारी लागणार नाहीत. गोरगरिबांसह सर्वांनाच सारखे पाणी मिळेल, असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

Veerchak Dam
Dhule Crime News : सराईत चोराला बेड्या; 9 दुचाकी हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com